Marcus Stoinis T20 Ranking  esakal
Cricket

Marcus Stoinis : मार्कस स्टॉयनिसने मोहम्मद नबीचं अव्वल स्थान हिसकावलं; टी 20 अष्टपैलू रँकिंगमध्ये झाले मोठे बदल

ICC T20Is Ranking : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचे बक्षीस त्याला आयसीसी रँकिंगमध्ये मिळाले आहे.

अनिरुद्ध संकपाळ

ICC T20Is Ranking Marcus Stoinis : ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली. आयसीसी टी 20 ऑल राऊंडर रँकिंगमध्ये त्याने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला खाली खेचत अव्वल स्थान पटकावले. दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगा तर तिसऱ्या स्थानावर बांगलादेशचा शाकीब अल हसन आला आहे.

मार्कस स्टॉयनिसने नामिबियाविरूद्धच्या सामन्यात 9 धावात दोन विकेट्स घेतल्या. त्याने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये स्कॉटलँडविरूद्ध 29 चेंडूत 59 धावांची खेळी देखील केली होती. त्याचा फायदा त्याला आयसीसी रँकिंगमध्ये झाला.

दरम्यान, आयसीसी टी 20 बॉलिंग रँकिंगमध्ये इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिद अव्वल स्थानावर कायम आहे. तर वेस्ट इंडीजचा अकिल हुसैनने सहा स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले. भारताचा सूर्यकुमार यादव टी 20 बॅटिंग रँकिंगमध्ये आपली गादी दीर्घ काळापासून राखून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT