India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024 Sakal
Cricket

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Women's T20 World Cup 2024 India vs New Zealand: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. शुक्रवारी भारताला न्यूझीलंडने पराभूत केले.

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2024 India vs New Zealand: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पराभवाचा धक्का बसला. दुबईला झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने ५८ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारतासाठी मात्र या स्पर्धेच्या मोहिमेला पराभवाने सुरुवात झाली आहे.

या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंड संघाने १६१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी कोलमडली. भारतीय संघ १९ षटकात १०२ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन आणि गोलंदाजांनी या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारताकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्मा सलामीला फलंदाजीसाठी उतरल्या होत्या. पण दुसऱ्याच षटकात भारताला पहिला धक्का बसला. शफालीला इडेन कार्सनने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत २ धावांवर बाद केले. त्यानंतर मानधनाही पाचव्या षटकात १२ धावा करून कार्सनच्याविरुद्धच मॅडी ग्रीनकडे झेल देत बाद झाली.

त्यानंतर हरमनप्रीत आणि जेमिमाह रोड्रिग्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण चांगल्या सुरुवातीचा फायदा त्यांना घेता आला नाही. हरमनप्रीत १४ चेंडूत १५ धावा करून रोझमेरी मेअरविरुद्ध खेळताना पायचीत झाली.

पाठोपाठ ली ताहुहूने जेमिमाहला १३ धावांवर माघारी धाडले. मधल्या षटकात ताहुहूची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. तिने ऋचा घोषलाही फार वेळ टिकू दिलं नाही. तिला १२ धावांवर ११ व्या षटकात बाद केलं, तर ताहुहूने दिप्ती शर्मालाही १३ धावांवर १५ व्या षटकात बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

दिप्ती बाद झाल्यानंतर भारताच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या होत्या. तरी भारतीय संघाला लक्ष्याच्या जवळ घेऊन जाण्याची तळातल्या फलंदाजांनी प्रयत्न केला. पण पुजा वस्त्राकरला ८ धावांवर एमेलिया केरने बाद केले. त्यानंतर रोझमेरी मेअरने श्रेयंका पाटीलला ७ धावांवर आणि रेणुका सिंग ठाकुरला शुन्यावरच बाद केले. त्यामुळे भारताचा डाव १०२ धावांवरच संपला.

न्यूझीलंडकडून रोझमेरी मेअरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच ली ताहुहूने ३ विकेट्स घेतल्या, तर इडेन कार्सनने २ विकेट्स आणि एमेलिया केरने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १६० धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून सलामीला आलेल्या सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी चांगली सुरुवात दिली. बेट्सने २७ धावा केल्या, तर प्लिमरने ३४ धावा केल्या.

या दोघी बाद झाल्यानंतर कर्णधार सोफी डिवाईनने आधी एमेलिया केर आणि मग ब्रुक हालीडे यांना साथीला घेत न्यूझीलंडला १६० धावांपर्यंत पोहचवले. डिवाईन अर्धशतक करून नाबाद राहिली. तिने ३६ चेंडूत ७ चौकारांसह ५७ धावांची नाबाद खेळी केली. एमेलियाने १३ धावांची खेळी केली. तसेच हालीडेने १६ धावांची खेळी केली.

भारताकडून रेणुका सिंगने २ विकेट्स घेतल्या, तसेच अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT