Nassau Stadium sakal
Cricket

Nassau Stadium : अमेरिकेत खेळपट्टीचे ‘रोपटे’ रुजले नाही;नासाऊ स्टेडियमच्या मैदानाबाबतही प्रश्नचिन्ह,सामन्यांचा होतोय बेरंग

आम्ही करतो ते सर्वोत्तम अशी शेखी मिरवणाऱ्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या लोकांना क्रिकेटरसिक प्रेक्षकांकडून चांगली चपराक बसते आहे.

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : आम्ही करतो ते सर्वोत्तम अशी शेखी मिरवणाऱ्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या लोकांना क्रिकेटरसिक प्रेक्षकांकडून चांगली चपराक बसते आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ कौंटी मैदानावरील खेळपट्टी अमेरिकेच्या फ्लोरिडा भागातील माती वापरून ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांनी चार ट्रेमध्ये चार क्रिकेट खेळपट्ट्या बनवल्या आणि त्या प्रचंड मोठ्या ट्रकवर आणून खोलीत कारपेट बसवतात तशा बसवल्या; पण झाले भलतेच; फ्लोरिडा राज्यातील मातीने न्यूयॉर्कला येऊन रुजायला नकार दिला. परिणामी मैदानावरील खेळपट्ट्या अपेक्षेपेक्षा खूप विचित्र स्वभावाच्या निघाल्या आहेत.

दोन सामने या मैदानावर मुख्य टी२० विश्वचषक स्पर्धेतले झाले आहेत ज्यावर प्रथम फलंदाजी करणाऱ्‍या संघाला शतकी धावसंख्याही ओलांडता आलेली नाही. उलटपक्षी ज्या कोणी या खेळपट्टीवर फलंदाजी केली, त्या फलंदाजाला कधी बोटांवर; तर कधी बरगडीत चेंडू लागून इजा झाली आहे. बांगलादेशसमोर सराव सामना आणि आयर्लंडविरुद्ध मुख्य स्पर्धेतील साखळी सामना खेळून झाल्यावरही भारतीय संघाने खेळपट्टीविषयी कोणतीही तक्रार केलेली नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड आणि कप्तान रोहित शर्मा यांनी, आम्हांला खेळपट्टीशी जुळवून घ्यावे लागेल, असे सांगून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. संयोजकांना भारतीय संघ नव्हे, तर पत्रकार आणि समालोचन करणाऱ्या माजी खेळाडूंनी टीकेचे लक्ष्य केले आहे.

दोन कोटी डॉलरचा खर्च; तरीही...

दोन कोटी ५० लाख डॉलर खर्च करून नासाऊ कौंटी भागात अत्याधुनिक क्रिकेट मैदान उभारण्याचा पराक्रम केला गेला. भव्य दिसणारी बाह्य वास्तू कमाल बनवली गेली आहे. कळीचा मुद्दा खेळपट्टी आणि बाह्य मैदानाचा आहे. न्यूयॉर्क भागात थंडीचा भर उशिरा ओसरल्याने मैदानावरील गवताला मुळे फुटून ती खोलवर रुजायला संधी कमी मिळाली. टीव्हीवर मैदान हिरवेगार दिसत असले, तरी प्रत्यक्षात खेळाडूंना खेळताना गवत नव्हे, तर रेती स्पष्ट दिसते आहे. प्रशिक्षकांनी खेळाडूंना सूर मारायला किंवा चेंडू अडवताना घसरत जायला मनाई केली आहे.

भारत-पाक सामन्याची चिंता

रविवारी याच मैदानावर भारत वि. पाकिस्तान असा स्पर्धेतील सर्वात लक्षणीय सामना होणार आहे. जगभरच्या क्रिकेटरसिकांचे लक्ष या सामन्याकडे लागणार असताना खेळपट्टीच्या विचित्र स्वभावामुळे सामना रंगणार की नाही, अशी शंका सगळ्यांना भेडसावत आहे. मैदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रविवारच्या सामन्यासाठी खेळपट्टी तयार करताना नक्की किती पाणी मारावे आणि किती काळ रोलिंग करावे, याचा उलगडा होत नाहीये. जास्त रोलिंग केले, तर खेळपट्टीला पडत असलेल्या भेगा अजून मोठ्या होण्याची भीती वाटत आहे. पूर्ण झालेल्या दोन सामन्यांत अगदी पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवरील याच भेगांनी वेगवान गोलंदाजांना साथ देताना फलंदाजांवर आघात केला आहे.

तक्रार करणार नाही

प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा मिळताना दिसत असल्याने नाणेफेकीचे महत्त्व वाढले आहे. निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढायला स्थानिक संयोजक धडपडत असले, तरी त्यावर ठोस उपाय मिळायची शक्यता कमी असल्याचे सत्य समोर येत आहे. भारतीय संघातील खेळाडूंशी ‘सकाळ’ने संवाद साधला असता समजले, की खेळपट्टीवरून भारतीय संघ कोणतीही तक्रार करणार नाही. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान भारतीय फलंदाज स्वीकारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laadki Bahin Yojana : भाऊबीजेला मिळणार लाडक्या बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?

Government Officer : संघाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या आणखी एका सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई; वैद्यकीय अधिकाऱ्याला केलं निलंबित

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं! सोहमची पूजाच्या फोटोंवर खास कमेंट, व्यक्त केलं मनातलं प्रेम

Latest Marathi News Live Update : "देवा" आता तूच आमच्या अण्णाला माफ कर, वसंत मोरे यांचे अनोखे आंदोलन

JEE Main 2026 परीक्षा वेळापत्रक जाहीर; अर्ज प्रक्रिया लवकरच होणार सुरु

SCROLL FOR NEXT