IND vs BAN 1T20I esakal
Cricket

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

India vs Bangladesh 1st T20I : भारत-बांगलादेश यांच्यातला पहिला ट्वेंटी-२० सामना आज ग्वालियर येथे होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणखी एक मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 1st T20I Marathi Update : कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. काही प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू बांगलादेशला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. काल भारतीय खेळाडूंनी पहिल्या ट्वेंटी-२० साठी नेट्समध्ये कसून सराव केला आणि त्यांची फटकेबाजी पाहून कॅप्टन सूर्या इम्प्रेस झालेला दिसला.. त्याने फलंदाजांच्या प्रत्येक फटक्याचे त्याच्या स्टाईलमध्ये कौतुक केले.

पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताला धक्का बसला. अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे ( Shivam Dube) याने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली. त्याच्याजागी तिलक वर्माची संघात निवड केली गेली आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाकडे अनुभवाची कमतरता असली तरी त्यांचा जोश हाय आहे. सूर्यासोडला तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग हे दोन अनुभवी खेळाडू संघात आहेत. तेच दुसरीकडे बांगलादेशच्या संघात अनुभवी खेळाडूंची संख्या जास्त आहे. मयांक यादव, नितीश कुमार रेड्डी व हर्षित राणा यांना पदार्पणाची संधी आहे. अभिषेक शर्मा ज्याने झिम्बाब्वेविरुद्ध जुलै महिन्यात पदार्पण करताना शतकी खेळी केली होती, त्याचे पुनरागमन होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने कसून सराव केला आहे आणि BCCI ने त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

भारताचा संभाव्य संघ – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा/मयांक यादव, अर्शदीप सिंग

बांगलादेशचा संभाव्य संघ – लिटन दास, परवेझ होसैन इमोन, तंझीज हसन, नजमूल शांतो, मेहिदी हसन मिराज, तौहिद हृदय, महमुदुल्लाह, रिषद होसैन, तंझिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्ताफिजूर रहमान

ग्वाल्हेर शहराच्या माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवरील हा १४ वर्षांनंतरचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे. येथे शेवटचा सामना फेब्रुवारी २०१० मध्ये झाला होता जेव्हा सचिन तेंडुलकरने कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर वन डेतील पहिले द्विशतक झळकावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT