Team India Sakal
Cricket

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

India vs Bangladesh Chennai Test Updates: भारत विरुद्ध बांगलादेश संघात चेन्नईमध्ये सुरू असलेला पहिला सामन्यातील दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला.

Pranali Kodre

India vs Bangladesh 1st Test end of 2nd Day report: भारतीय क्रिकेट संघ दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरला असून बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. भारत आणि बांगलादेश संघात पहिला कसोटी सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे.

या सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात २३ षटकात ३ बाद ८१ धावा केल्या आहेत. पण पहिल्या डावातील आघाडीमुळे भारताची आघाडी ३०८ धावांपर्यंत वाढली आहे. दुसऱ्या दिवस अखेर शुभमन गिल ३३ धावांवर नाबाद राहिला, तर ऋषभ पंत १२ धावांवर नाबाद राहिला.

बांगलादेशचा पहिला डाव संपल्यानंतर भारताकडे २२७ धावांची आघाडी होती. परंतु, भारताने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. दुसऱ्या डावातही भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी फलंदाजीची सुरुवात केली.

परंतु, तिसऱ्या षटकात तस्किन अहमदने भारताचा कर्णधार रोहित शर्माला ५ धावांवरच बाद केले. रोहितचा झेल स्लीपमध्ये झाकिर हसनने घेतला. रोहित पहिल्या डावातही ६ धावांवरच बाद झाला होता.

जैस्वालही दुसऱ्या डावात फार काही करू शकला नाही. त्याने पहिल्या डावात ५६ धावा केल्या होत्या. परंतु, दुसऱ्या डावात त्याला नाहिद राणाने यष्टीरक्षक लिटन दासच्या हातून १० धावांवर झेलबाद केले.

यानंतर भारताचा डाव शुभमन गिल आणि विराट कोहलीने सावरला होता. त्यांची भागीदारी चांगली सुरू होती. पण अखेर २० व्या षटकात मेहदी हसन मिराझने बांगलादेशला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने विराट कोहलीला १७ धावांवर पायचीत केले. त्यामुळे भारताने ६७ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या.

विराट बाद झाल्यानंतर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्याने फलंदाजीला आल्यानंतर काही आक्रमक शॉट्सही खेळले.

तत्पुर्वी दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात ८१ षटकापासून आणि ६ बाद ३३९ धावांपासून पुढे खेळायला सुरूवात केली होती. त्यावेळी आर अश्विन १०२ धावांवर आणि रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत होते.

परंतु, नंतर फार धावा जोडल्या गेल्या नाहीत. जडेजा ८६ धावांवरच बाद झाला. तसेच आर अश्विनने १३३ चेंडूत ११३ धावा केल्या. तसेच आकाश दीपने १७ धावा केल्या. भारताचा डाव ९१.२ षटकात ३७६ धावांवर संपला.

बांगलादेशकडून पहिल्या डावात हसन मेहमुदने शानदार गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या. तस्किन अहमदनेही त्याला साथ देताना ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर बांगलादेशचा पहिला डावही ४७.१ षटकात १४९ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून सर्वाधिक धावा शाकिब अल हसनला करता आल्या. त्याने ३२ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय केवळ मेहदी हसन मिराज (२७), लिटन दास (२२) आणि नजमुल हुसैन शांतो (२०) यांनाच २० धावांचा टप्पा पार करता आला.

भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रविंद्र जडेजा यांनी २-२ विकेट्स घेतल्या. बुमराहने या ४ विकेट्स घेताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० विकेट्सचा टप्पाही पार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT