IND vs BAN 2nd Test esakal
Cricket

IND vs BAN 2nd Test : भारतीय संघ ६-३-२ या कॉम्बिनेशनसह दुसरी कसोटी खेळणार; कानपूरची खेळपट्टी रंग दाखवणार

India playing XI vs Ban 2nd Test : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. २७ सप्टेंबरपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे आणि त्यात भारत ६-३-२ अशा रणनीतीने उतरणार आहे

Swadesh Ghanekar

IND vs BAN 2nd Test Probable Playing XI : भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( WTC ) अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. मालिकेत १-० अशी आघाडी घेऊन भारतीय संघ २७ सप्टेंबरपासून कानपूर कसोटीत मैदानावर उतणार आहे. पण, यावेळी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे.

कानपूरमध्ये २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत बांगलादेश कसोटीची खेळपट्टीसाठी काळी माती वापरली गेली आहे. त्यामुळे चेन्नईच्या तुलनेत ( लाल माती) कानपूरच्याख खेळपट्टीवर जास्त बाऊन्स मिळणार नाही. ग्रीन पार्कची खेळपट्टी चेन्नईच्या खेळपट्टीपेक्षा सपाट असेल आणि कसोटी जसजशी पुढे सरकेल तसा बाऊन्सही कमी होईल. कानपूरची खेळपट्टी संथ असण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही संघ आपली रणनीती बदलू शकतात. दोन्ही संघ अतिरिक्त फिरकीपटूसह मैदानावर उतरू शकता. त्यामुळे आर अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या जोडीला भारताला कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवावे लागेल.

जसप्रीत बुमराहला विश्रांती?

२०२१ मध्ये भारताने कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती आणि तेव्हा भारतीय संघ अश्विन, जडेजा, अक्षर या फिरकी त्रिकूटासह मैदानात उतरले होते. न्यूझीलंडने हा सामना अनिर्णित सोडवला होता. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाईल असा अंदाज होता. पण, तो ही कसोटी खेळेल आणि मोहम्मद सिराज किंवा आकाश दीप यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.

अक्षर पटेल की कुलदीप यादव?

तिसरा फिरकीपटू म्हणून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांची नावं चर्चेत आहेत. कुलदीपने गोलंदाजीत कमाल करून दाखवली आहे, परंतु अक्षर अष्टपैलू कामगिरी करणारा आहे. नुकत्याच दुलीप ट्रॉफीत त्याने फलंदाजीत चांगली कामगिरी करून दाखवली होती. त्यामुळे या दोघांपैकी रोहित कोणाला संधी देतो, याची उत्सुकता आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT