Harshit Rana Sakal
Cricket

IND vs BAN: हर्षित राणाला का दिली नाही पदार्पणाची संधी? टॉसनंतर लगेचच BCCI ने सांगितलं खरं कारण

Why Harshit Rana was unavailable for selection for third T20I: भारत विरुद्ध बांगलादेश संघात शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यातून हर्षित राणा पदार्पण करेल अशी चर्चा होती. मात्र, त्याला या सामन्यासाठी का संधी दिली नाही, यामागील कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

India vs Bangladesh 3rd T20I: भारत विरुद्ध बांगलादेश संघात टी२० मालिका सध्या खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना शनिवारी (१२ ऑक्टोबर) हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. या सामन्यासाठी अर्शदीप सिंगला विश्रांती दिली असून त्याच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे.

खरंतर या सामन्यात हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल केल्याने हर्षितला आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पण नाणेफेक झाल्यानंतर बीसीसीआयने लगेचच त्याला संधी का दिली नाही याबद्दल खुलासा केला आहे. तो आजारी असल्याने संधी दिली नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयकडून सांगण्यात आले की त्याला व्हायरल इन्फेक्शन असून तो स्टेडियममध्येही आलेला नाही.

बांगलादेशने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. तसेच हा सामना अनुभवी अष्टपैलू महमुद्दुलाहचा अखेरचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना आहे. त्यामुळे त्याला विजयी निरोप देण्यासाठी बांगलादेश उत्सुक असेल.

मालिकेत भारताला निर्विवाद वर्चस्वाची संधी

या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने सहज जिंकले आहेत. त्यामुळे २-० ने आघाडी घेतलेल्या भारताने मालिकेत आधीच विजय निश्चित केला आहे. त्यामुळे आता भारताला बांगलादेशला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे.

तसेच बांगलादेशही टी२० मालिकेत व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याचबरोबर भारत दौऱ्याचाही शेवट गोड करण्याचा प्रयत्न बांगलादेशचा असणार आहे. यापूर्वी त्यांना कसोटी मालिकेतही व्हाईटवॉशचा सामना करावा लागला होता.

असे आहेत प्लेइंग-११

भारत - संजू सॅमसन(यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव(कर्णधार), नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव.

बांगलादेश - परवेझ हुसैन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्लाह, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice Presidential Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती निवडणुकीवर आता आणखी एका पक्षाने टाकला बहिष्कार अन् कारणही सांगितलं!

Nepal PM KP Sharma Oli : नेपाळच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा! ; 'पंतप्रधानपद गेलं तरी बेहत्तर, सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही'

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT