Team India Sakal
Cricket

IND vs BAN, Test: Rohit Sharma चा मास्टरस्ट्रोक, टीम इंडियाचा मालिका विजय! बांगलादेशला पावसाची साथ मिळाली, तरीही....

India Won Series by 2-0 Against Bangladesh: भारतीय संघाने कानपूरला झालेल्या कसोटीत बांगलादेशला अडीच दिवसांचाच खेळ होऊनही पराभवाचा धक्का दिला. यासह भारताने मालिकाही जिंकली.

Pranali Kodre

India vs Bangladesh Test Series: कानपूर कसोटीत अडीच दिवस पावसाचे आणि अडीच दिवस भारतीय संघाचे असा खेळ झालेला पाहायला मिळाला. भारताने पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दुसरी कसोटी जिंकणे भारतासाठी महत्त्वाचे होते. पण, पावसाचे खोडा घातला... अडीच दिवस पावसामुळे वाया गेले. त्यामुळे कसोटीचा निकाल अनिर्णित राहिल असेच वाटत होते. पण, कर्णधार रोहित शर्माने बॅझबॉल स्टाईल फलंदाजीच्या सूचना सहकाऱ्यांना केल्या अन् त्याचा हा मास्टरस्ट्रोक यशस्वी ठरला.

रोहितला भारतीय गोलंदाजांनीही तोलामोलाची साथ दिली. त्यांनी शानदार गोलंदाजी करत बांगलादेशचे फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकणार नाहीत, याची काळजी घेतली. त्यामुळे भारताने दुसरी कसोटी खरं तर दोन दिवसांत जिंकली आणि मालिकेत २-० अशा विजयासह WTC Standing मधील अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट होते. पावसामुळे पहिल्या दिवशी ३५ षटकांचाच खेळ झालेला, तर दुसरा आणि तिसरा दिवस वायाही गेला होता. पण असं असतानाही भारताने सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसऱ्याच सत्रात ७ विकेट्सने विजय निश्चित केला.

भारतासमोर बांगलादेशने विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने १७.२ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून सुरुवात कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी आक्रमक केली होती. पण रोहितला मेहदी हसन मिराजने ८ धावांवर बाद केले.

त्यानंतरही शुभमन गिलने जैस्वालला साथ देण्याचा प्रयत्न केला. परंतु, गिललाही मेहदी हसन मिराजने ६ धावांवर पायचीत केले. पण त्यांनंतर जैस्वाल आणि विराट कोहलीने डाव सावरत भारताला सहज ९५ धावांचे लक्ष्य गाठून दिले.

जैस्वालने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही आक्रमक अर्धशतक केले. तो भारताला विजयासाठी ३ धावाच हव्या असताना ५१ धावांवर बाद झाला. त्याला तैजुल इस्लामने बाद केले. अखेर ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराट २९ धावांवर नाबाद राहिला, तर ऋषभ पंत ४ धावांवर नाबाद राहिला.

तत्पुर्वी, बांगलादेशने पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात ११ षटकांपासून २ बाद २६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. मात्र सुरुवातीलाच मोमिनुल हकला आर अश्विनने २ धावांवर माघारी धाडले.

पण त्यांनंतर शादमन इस्लाम आणि कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी ५५ धावांची भागीदारी केली होती. पण त्यांची भागीदारी रवींद्र जडेजाने मोडली. त्याने शांतोला १९ धावांवर त्रिफळाचीत केले.

त्यानंतर अर्धशतक करणारा शादमनलाही आकाश दीपने माघारी धाडले. त्याने १०१ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्यानंतर जडेजा आणि बुमराहचया गोलंदाजीसमोर बांगलादेशची खालची फळी टिकू शकली नाही.

तरी शेवटपर्यंत मुश्फिकूर रहिमने झुंज दिली होती. पण अखेर त्यालाच ४७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुश्फिकूर रहिमला बुमराहने ३७ धावांवर बाद करत बांगलादेशचा डाव १४६ धावांवर संपवला. भारताकडून गोलंदाजी करताना या डावात जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच आकाश दीपने १ विकेट घेतली.

पहिल्या डावात भारताने ५२ धावांची आघाडी घेतलेली असल्याने बांगलादेशला भारतासमोर ९५ धावांचेच आव्हान ठेवता आले. पहिल्या डावात बांगलादेशने ७४.२ षटकात सर्वबाद २३३ धावा केल्या होत्या.

बांगलादेशकडून मोमिनुल हकने १०७ धावांची खेळी केली होती. या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स घेतल्या होत्या, तर मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या. जडेजाने एक विकेट घेतली.

यानंतर भारताने पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी केली. पहिला डाव भारताने ३४.४ षटकात ९ बाद २८५ धावांवर घोषित केला.

भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तसेच केएल राहुलने ६८ धावा केल्या. विराट कोहलीने ४७ धावांची खेळी केली. तसेच रोहित शर्मा (२३) आणि शुभमन गिल (३९) यांनीही आक्रमक खेळ केला. बांगलादेशकडून या डावात मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या आहेत. हसन मेहमुदने १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT