India vs England 3rd Test Playing 11 Marathi news sakal
Cricket

Ind vs Eng Playing 11 : अखेर सर्फराज खान अन् ध्रुव जुरेल यांचे पदार्पण! संघात 4 मोठे बदल; रोहितने कोणाला संधी?

India vs England 3rd Test Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज गुरुवार 15 फेब्रुवारीला राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज गुरुवार 15 फेब्रुवारीला राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत संघात चार मोठे बदल करण्यात आले आहे. सर्फराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहेत.

पहिला सामना इंग्लंडने जिंकला आणि दुसरा सामना भारताने जिंकल्याने मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत हा सामना रंजक असेल. मात्र, भारताकडे अनुभवाची कमतरता आहे, तर इंग्लंडचा संघ मजबूत फॉर्ममध्ये आहे. भारतासाठी आज दोन खेळाडू पदार्पण करत आहेत, ज्यात सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांच्या नावाचा समावेश आहे. रजत पाटीदारने शेवटच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले.

तर अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. जडेजा दुखापतीमुळे शेवटच्या कसोटीत खेळला नव्हता.

सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल भारताकडून या कसोटीत पदार्पण करत आहेत. दोघांचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण आहे. अनिल कुंबळेने पदार्पणाची कॅप सरफराजला दिली. त्याचवेळी दिनेश कार्तिकने ध्रुवला पदार्पणाची कॅप दिली.

कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सर्फराज हा 311 वा तर ध्रु 312 वा खेळाडू आहे. सर्फराजला जेव्हा पदार्पणाची कॅप दिली जात होती, तेव्हा त्याचे प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानही तिथे उपस्थित होते. आपल्या मुलाला टोपी मिळाल्याचे पाहून तो रडला.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Dhikle : नाशिकमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ लागू करा; आमदार ढिकले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nashik News : ‘आयमा’-कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमाला यश; नाशिकमध्ये ६०० हून अधिक उमेदवारांची गर्दी

Jayant Patil : जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अन् अण्‍णासाहेब डांगे यांचा प्रवेश; नेमका काय योगायोग?

Sikkim Nomad Village: ‘डिजिटल नोमॅड व्हिलेज’ची सुरूवात सिक्कीममध्ये; याकतेन गावातून ग्रामीण पर्यटनाला नवा प्रवास

स्वच्छतेबाबतीतली समाजातली अनास्था दाखवणाऱ्या 'अवकारीका' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पथनाट्याने रंगला सोहळा

SCROLL FOR NEXT