Rohit Sharma
Rohit Sharma sakal
क्रिकेट

Rohit Sharma Ind vs Eng : तरुण खेळाडूंना कसोटी क्रिकेटची भूक, रोहित शर्माचा टोला कोणाला?

सुनंदन लेले

Ind vs Eng 4th Test Rohit Sharma : भारतीय संघात आलेल्या तरुण खेळाडूंमध्ये कसोटी क्रिकेटची भूक दिसून येत आहे, हे भारतीय क्रिकेटच्या भवितव्यासाठी सुचिन्ह आहे, असे मत कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील चौथा सामना जिंकून मालिका खिशात टाकणारा भारतीय कर्णधाराने विशेष करून सर्व नवोदित खेळाडूंचे कौतुक केले. तो म्हणतो, भारतीय संघात प्रवेश करणे कठीण काम असते. संघात बरेच वर्ष खेळणारे खेळाडू असतात तेव्हा सहजी कोणाला जागा उपलब्ध होत नाही.

बऱ्याच वेळा आम्हाला प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा खेळ सखोल अभ्यासायला वेळ मिळत नाही. मग जेव्हा कोणी अनुभवी खेळाडू दुखापतीने किंवा अन्य कारणाने मालिकेत खेळायला उपलब्ध नसतो तेव्हा शंका येते की अनुभव नसलेले खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावरच्या पातळीवर दडपणाखाली योग्य खेळ करू शकतील का? इंग्लंडसमोरच्या चार कसोटी सामन्यात दिसून आले आहे की, तरुण खेळाडू प्रथम श्रेणीचे क्रिकेट भरपूर खेळून तयार झाले आहेत, असे मत रोहितने व्यक्त केले.

संघ व्यवस्थापन म्हणून आमचे काम इतकेच आहे की, ड्रेसिंग रूम ज्याला आम्ही घर मानतो तिथले वातावरण चांगले राहावे. नव्याने संघात आलेल्या खेळाडूंना भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमची संस्कृती कळावी आणि त्यांनी त्याला अनुसरून राहावे... खेळावे... फुलावे. प्रत्येक नव्या खेळाडूला आम्ही कसे खेळावे हे शिकवत नाही तर त्याला ज्या कारणाने आतापर्यंत यश मिळाले आहे ते करायची मुभा देतो, त्याला आपल्या शैलीत खेळायचे स्वातंत्र्य देतो, रोहित शर्मा कार्यपद्धती समजावून सांगत होता.

कसोटी क्रिकेट सर्वात आवडता प्रकार आहे, कारण इथे झटपट खेळून विजय मिळत नाही, झगडावे लागते. या सामन्यासारखे अनेक वेळा अडचणींतून मार्ग शोधावा लागतो. रांची सामन्यात चार दिवस चार वेगळे रंग दिसले. खेळपट्टी झकास होती, ज्यावर गोलंदाज आणि फलंदाजांना समान संधी होती. १५० चेंडू खेळायची मानसिक, शारीरिक तयारी दाखवणाऱ्या फलंदाजाला मोठ्या धावा करता आल्या. अर्थातच फिरकी गोलंदाजांना योग्य संधी याच खेळपट्टीने उपलब्ध करून दिली. म्हणून सामना चार दिवस रंगला. खूप चढ-उतार झाले, असे रोहितने सांगितले.

ध्रुव जुरेलचे कौतुक

ध्रुव जुरेलने दोनही डावांत ज्याप्रकारे दडपणाखाली फलंदाजी केली ती विलक्षण होती. त्याची प्रगल्भ खेळी आणि फिरकी गोलंदाजांनी दुसऱ्या डावात केलेली कमाल कामगिरी भारतीय विजयासाठी निर्णायक ठरली, रोहित कौतुकाने सांगत होता.

सहा दिवसांची सुट्टी

रांची सामना चौथ्या दिवशी संपल्यावर खेळाडू मिळेल त्या विमानाने आपापल्या घरी गेले आहेत, कारण पाचवा कसोटी सामना ७ मार्चला धरमशाला येथे चालू होणार आहे. म्हणजेच सहा दिवस सुट्टी घेऊन भारतीय संघ ४ मार्चला चंडीगड येथे जमून धरमशालाला जाणार आहे. चार कसोटी सामन्यांनंतर मिळालेल्या गरजेच्या विश्रांतीचा खेळाडू आनंद घेणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT