India vs England 4th Test Day 2 Live Scorecard Updates News Marathi
India vs England 4th Test Day 2 Live Scorecard Updates News Marathi esakal
क्रिकेट

Ind vs Eng 4th Test Day 2 : पडझडीनंतर ध्रुव जुरेल अन् कुलदीपनं सावरला डाव, भारत दिवस अखेर 200 पार

Kiran Mahanavar

India vs England 4th Test Day 1 :

इंग्लंडच्या पहिल्या डावातील 353 धावांच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या भारतीय संघाची अवस्था बिकट झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या पहिल्या डावात 7 बाद 219 धावा झाल्या होत्या. भारत पहिल्या डावात अजूनही 134 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताकडून यशस्वी जैस्वालने 73 धावांची खेळी केली तर शुभमन गिलने 38 धावांचे योगदान दिले. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ध्रुव जुरेलने नाबाद 30 धावा केल्या तर तर कुलदीप 17 धावा करून नाबाद होता.

तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या. जो रुट 122 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 बळी घेतले.

इंग्लिश संघाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 7 गडी गमावून 302 धावांवर केली. दुसऱ्या दिवशी पाहुण्यांनी 51 धावा जोडल्या. रवींद्र जडेजाने भारताला शेवटचे तीन यश मिळवून दिले. जड्डूने आधी रूट-रॉबिन्सनची शतकी भागीदारी मोडली. रॉबिन्सन वैयक्तिक 58 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजाने शोएब बशीर आणि जेम्स अँडरसनची शिकार केली. रूट शेवटपर्यंत नाबाद राहिला.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : पडझडीनंतर ध्रुव जुरेल अन् कुलदीपनं सावरला डाव, भारत 200 पार

भारताची अवस्था 7 बाद 177 धावा अशी झाली असताना ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव यांनी भागीदारी रचत डाव सावरला. या दोघांनी भारताला 200 धावांच्या पार पोहचवलं.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : भारतीय संघ अडचणीत, बशीरनंतर हार्टलीने दिले धक्के, सात फलंदाज तंबूत

बशीरनंतर टॉम हार्टलीने भारताली पाठोपाठ धक्के देत भारताची अवस्था 7 बाद 177 धावा अशी केली. हार्टलीने सर्फराज खान आणि रविचंद्रन अश्विनची शिकार केली.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : भारताला पाचवा धक्का, सेट झालेला यशस्वी झाला बाद

बशीरने भारताचा सेट झालेला फलंदाज यशस्वी जैस्वालला 73 धावांवर बाद करत भारताला पाचवा आणि मोठा धक्का दिला. यशस्वी जैस्वाल बाद झाला त्यावेळी भारताच्या 161 धावा झाल्या होत्या.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : बशीरने भारताला दिले तीन धक्के; मदार यशस्वी अन् सर्फराजवरच

इंग्लंडचा युवा ऑफ स्पिनर बशीरने भारताची मधली फळी कापून काढली. त्याने शुभमन गिलला 38 धावांवर तर रजत पाटीदारला 17 तर जडेजाला 12 धावांवर बाद केलं. भारताची अवस्था 4 बाद 130 अशी झाली.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : यशस्वी जैस्वालचा अर्धशतकी धडाका, भारताचीही शतकी मजल

यशस्वी जैस्वालने मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक ठोकत भारताला शतकी मजल मारून किली.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : बशीरने फोडली यशस्वी - शुभमनची भागीदारी 

बशीरने शुभमन गिलला 38 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. याचबरोबर यशस्वी आणि शुभमनची दुसऱ्या विकेटसाठीची 82 धावांची भागीदारी संपुष्टात आली.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : भारताचे अर्धशतक पार 

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलने लंचनंतर पहिला अर्धा तास खेळून काढला. त्यानंतर धावांची गती वाढवली. भारताने अर्धशतक पार केलं असून 19 षटकात 1 बाद 63 धावा केल्या आहेत. गिल आणि यशस्वीची भागीदारी देखील 59 धावांपर्यंत पोहचली आहे.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : गिल अन् यशस्वी पुन्हा एकदा मैदानात, जोडी लंचपर्यंत स्थिरावली

भारताने इंग्लंडच्या 353 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवशीच्या लंचपर्यंत 1 बाद 34 धावा केल्या. यात यशस्वी जैस्वालचे योगदान हे 27 धावांचे होते.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित 2 वर आऊट... इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर खल्लास

भारताला पहिला धक्का चारच्या स्कोअरवर बसला आहे. जेम्स अँडरसनच्या चेंडूवर दोन धावा काढून कर्णधार रोहित शर्मा आऊठ झाला. अँडरसनने त्याला आऊट केले. सध्या यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : रवींद्र जडेजाचा विकेटचा चौकार...! इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर खल्लास

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर संपला आहे. आज इंग्लंडने सात विकेट्सवर 302 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. संघाने 51 धावांची भर घालताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. रवींद्र जडेजाने तिन्ही विकेट घेतल्या.

त्याने एकाच षटकात ऑली रॉबिन्सन आणि शोएब बशीरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजाने आधी रॉबिन्सन आणि जो रूटची 102 धावांची भागीदारी तोडली. त्यानंतर त्याने जेम्स अँडरसनला एलबीडब्ल्यू आऊट करून इंग्लंडचा डाव 353 धावांवर आटोपला.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : रवींद्र जडेजाची कमाल; एकाच षटकात इंग्लंडला दुहेरी धक्का 

रवींद्र जडेजाने इंग्लंडच्या डावातील 103 व्या षटकात दोन विकेट घेतल्या. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ऑली रॉबिन्सन झेलबाद झाला. त्याला 58 धावा करता आल्या. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने शोएब बशीरला आऊट केले. त्याला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडने नऊ गड्यांच्या मोबदल्यात 352 धावा केल्या आहेत.

Ind vs Eng 4th Test Day 2 Live : शेपूट वळवळलं...! रॉबिन्सनचे अर्धशतक; इंग्लंडची धावसंख्या 330 धावा पार

ऑली रॉबिन्सनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. त्याचबरोबर जो रूटही मैदानावर आहे. या दोघांनी इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. भारतीय संघाला ही भागीदारी लवकरात लवकर तोडावी लागणार आहे. दोघांमध्ये 80 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT