Laxman Sivaramakrishnan on R Ashwin Marathi News sakal
Cricket

Ind vs Eng R Ashwin : “मी इतके फोन केले पण...” 100 व्या कसोटीआधी माजी खेळाडूने अश्विनवर केले गंभीर आरोप

Laxman Sivaramakrishnan on R Ashwin : टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Kiran Mahanavar

India vs England 5th Test Dharamsala : टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये भारतासाठी 500 बळी घेत इतिहास रचला. ही खास कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला.

आता अश्विन पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. धरमशाला येथे होणाऱ्या पुढील सामन्यात तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी खेळणार आहे. मात्र, या अविस्मरणीय सामन्यापूर्वी एका माजी दिग्गज खेळाडूने त्यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

भारताचा माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्विनवर मोठा आरोप केला आहे. यासोबतच माजी खेळाडूंचा अशाप्रकारे अपमान करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अश्विनच्या 100व्या आंतरराष्ट्रीय कसोटीपूर्वी तामिळनाडूचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णनने त्याच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यावर त्यांनी लिहिले की, त्याला मी फोन केला. पण त्याने माझा फोन कट केला. नंतर मी मेसेज पाठवला, पण अद्याप रिप्लाय केला नाही... माजी क्रिकेटपटूंना असाच सन्मान मिळतो.

भारतासाठी नऊ कसोटी सामने खेळलेले लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी हा खुलासा करताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी अश्विनवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने मोठे विधान केले होते. आता तो पुन्हा एकदा स्टार स्पिनरवर निशाणा साधत असताना चाहते हे जुने ट्विट दाखवून त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT