ऑली पोप sakal
Cricket

Ind vs Eng Test : कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेत स्टोक्सचेही मोठे योगदान ; पोप

कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा चांगला आदर मिळवून देण्यात इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्सचेही मोठे योगदान आहे, अशा शब्दात इंग्लंडचा फलंदाज ऑली पोपने त्याचे कौतूक केले.

सकाळ वृत्तसेवा

राजकोट : कसोटी क्रिकेटला पुन्हा एकदा चांगला आदर मिळवून देण्यात इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्सचेही मोठे योगदान आहे, अशा शब्दात इंग्लंडचा फलंदाज ऑली पोपने त्याचे कौतूक केले. गुरुवारपासून सुरु होणारा भारताविरुद्धचा सामना हा स्टोक्सचा १०० वा कसोटी सामना असणार आहे. इंग्लंडचे नेतृत्व स्वीकारल्यानवंतर बेन स्टोक्सने अनेक आव्हानात्मक परिस्थितीत संघाला काही अविस्मरणीय विजय मिळवून दिलेले आहे. बॅझबॉल या नव्या पवित्र्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये बेडर कर्णधार अशी स्वतःची ओळखही निर्माण केली आहे. इंग्लंडने मिळवलेल्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय विश्वकरंडक विजेतेपदामध्येही त्याने मोलाची कामगिरी केलेली आहे.

संघाला गरज लागली तेव्हा स्टोक्स हमखास मदतीला धावून आलेला आहे. ॲशेस मालिकेतील लॉर्डस येथे झालेला सामना आणि त्यात स्टोक्सने केलेली फलंदाजी आम्ही कोणीच विसरू शकत नाही, असे पोपने सांगितले. १०० कसोटी खेळणे ही फार मोठी कामगिरी असते. त्यानेही आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत काही चढ उतार अनुभवले आहेत, पण कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याच्यातील बदल अफलातून आहे, असे पोप म्हणाला.

कर्णधार म्हणून तो निर्णयातही ठाम असतो आणि प्रत्येकाला समजावून घेत असतो. माझ्याकडे तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी असेल, असे स्टोक्सने कर्णधार झाल्यावर लगेचच मला सांगितले सोबत आत्मविश्वासही दिला. स्टोक्सचे संघ व्यवस्थापन कमालीचे आहे. केवळ खेळाडूच नव्हे तर फिजिओ, डॉक्टर यांनाही तो विश्वासात घेतो, असे सांगत पोपने त्याला १०० व्या कसोटीसाठी शुभेच्छा दिल्या. विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणारा स्टोक्स त्यानंतर थेट भारताविरुद्धच्या या मालिकेत खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT