IND vs NZ 1st Test  esakal
Cricket

IND vs NZ 1st Test : बंगळुरूचा पाऊस टीम इंडियाचे WTC Final Scenario बिघडवतोय; रोहित शर्माचं टेंशन वाढवतोय

World Test Championship 2025 final : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीची दोन सत्र पावसामुळे वाया गेली आहेत. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारी लढत पावसामुळे वाया गेल्यास टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार आहे...

Swadesh Ghanekar

World Test Championship 2025 final Team india Scenario: भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाने धुमाकूळ घातला आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील या कसोटीचे पहिले दोन सत्र पावसामुळे वाया गेली आहेत. आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी त्याचा लपंडाव सुरू आहे आणि ही गोष्ट टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या कसोटीचे चार दिवस पावसामुळे वाया जाऊ शकतात...

WTC Final च्या अगदी जवळ

भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी पावसामुळे वाया गेल्यास, भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचा मार्ग अवघड होणार का, हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय.भारतीय संघाने WTC च्या दोन्ही फायनल खेळल्या आहेत. पहिल्या पर्वात भारताला न्यूझीलंडकडून आणि दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये हार पत्करावी लागली होती.

भारतीय संघ सलग तिसऱ्या पर्वात WTC Final खेळण्यासाठी सज्ज आहे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवेल असा विश्वास आहे. सध्या भारतीय संघ ११ सामन्यांत ८ विजय, २ पराभव व १ ड्रॉ अशा निकालांसह ७४.२४ टक्केवारी मिळवून तालिकेत अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ( ६२.५०) आणि श्रीलंका ( ५५.५६) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हेही संघ फायनलच्या शर्यतीत आहेत.

बंगळुरू कसोटी रद्द झाल्यास काय?

बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला आहे आणि उर्वरित दिवसांवरही पावसाचे सावट आहे. अशात ही कसोटी रद्द झाल्यास टीम इंडियाचे wtc फायनलचे तिकीट थोडे लांबणीवर पडेल. भारताने उर्वरित दोन कसोटी सामने जिंकल्यास त्यांचे फायनलचे तिकीट पट्के होईल. ही फायनल पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर खेळली जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT