IND vs PAK Champions Trophy esakal
Cricket

IND vs PAK Champions Trophy: लाहोरमध्ये पुन्हा होणार गदर... तारीख, दिवस ठरला! टीम इंडिया उखडणार पाकिस्तानची स्टम्प

IND vs PAK Champions Trophy 2025 Match: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्याची तारीख जाहीर केली आहे. हा सामना 1 मार्चला लाहोरमध्ये खेळला जाईल.

Sandip Kapde

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळली जाईल, तर 10 मार्च हा राखीव दिवस असेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पुढील वर्षी 1 मार्च रोजी लाहोरमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या संघाचा महत्त्वाचा सामना निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तात्पुरत्या वेळापत्रकाला बीसीसीआयने अद्याप संमती दिलेली नाही. आयसीसी बोर्डाच्या एका वरिष्ठ सदस्याने बुधवारी पीटीआयला ही माहिती दिली.

सामन्याचे वेळापत्रक-

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्याची तारीख जाहीर केली आहे. हा सामना 1 मार्चला लाहोरमध्ये खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये होणार आहे. PCB चे चेअरमन मोहसिन नकवी यांनी आयसीसीला 15 सामन्यांचा शेड्यूल सादर केला आहे. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित केले जातील. लाहोरमध्ये सात सामने, कराचीमध्ये तीन आणि रावलपिंडीमध्ये पाच सामने होणार आहेत.

ग्रुप ए आणि बी-

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन ग्रुप असतील. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत, तर ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान आहेत. 1996 नंतर प्रथमच, पाकिस्तान मोठ्या ICC स्पर्धेचे आयोजन करणार आहे. 2008 मध्ये संपूर्ण आशिया चषक आणि गेल्या वर्षी याच स्पर्धेचे काही सामने आपल्या भूमीवर आयोजित केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप अधिकृतपणे सांगितले नाही की ते आयसीसी स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघ पाकिस्तानला पाठवतील की नाही.

स्पर्धेची तयारी-

आयसीसी बोर्डाच्या एका सदस्याने सांगितले की, "पीसीबीने 15 सामन्यांचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मसुदा सादर केला आहे. सात सामने लाहोरमध्ये, तीन कराचीमध्ये आणि पाच रावळपिंडीमध्ये होतील. सलामीचा सामना कराचीमध्ये होणार आहे, तर दोन उपांत्य फेरीचे आयोजन कराची आणि रावळपिंडी येथे केले जाईल. याशिवाय, सर्व भारतीय सामने (उपांत्य फेरीसह, जर संघ पात्र ठरला तर) लाहोरमध्ये खेळले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT