IND vs SL 1stODI Shivam Dube esakal
Cricket

IND vs SL 1st ODI Live : १६९१ दिवसानंतर पहिली विकेट; रोहितच्या 'लाडक्या'ने संधीचं केलं सोनं

IND vs SL 1st ODI Rohit Sharma : भारत-श्रीलंका यांच्यातला पहिला वन डे सामना सुरू आहे आणि भारताने दोन विकेट्स घेत यजमानांना बॅकफूटवर फेकले आहे.

Swadesh Ghanekar

India vs Sri Lanka 1st ODI Live Update - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाने पहिल्या वन डे सामन्यात पकड घेतलेली दिसतेय. भारतीय संघाने पहिल्या १३.१ षटकांत श्रीलंकेचे दोन फलंदाज बाद केले आहेत. रोहितने या सामन्यात त्याच्या लाडक्या खेळाडूला संधी दिली. या खेळाडू तब्बत ५ वर्षांनी वन डे सामना खेळतोय आणि त्यानं संधीचं सोनं करताना विकेटही मिळवली.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मैदानावर परतलेल्या रोहित शर्मा व विराट कोहली यांना पाहून चाहते आनंदीत झाले. या दोघांव्यतिरिक्त लोकेश राहुल, श्रेयस अय्यर व कुलदीप यादव यांचे पुनरागमन झाले. शिवम दुबे २०१९ नंतर पहिलीच वन डे मॅच खेळायला उतरला आहे. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत ज्या पद्धतीने भारताने खेळ केला, तोच खेळ वन डे मालिकेत कायम राखण्याचा रोहितचा निर्धार आहे. या सामन्यात भारतीय खेळाडू हातावर काळी फित घातून मैदानावर उतरले. भारताचे माजी कर्णधार अंशूमन गायकवाड यांचे नुकतेच कॅन्सरमुळे निधन झाले आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाने काळी फित दंडावर बांधली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेला मोहम्मद सिराजने तिसऱ्या षटकात धक्का दिला. अविष्का फर्नांडो ( १) अर्शदीपच्या हाती झेल देऊन परतला. १४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शिवम दुबेने कुसल मेंडिसला ( १४) पायचीत करून माघारी पाठवले. दुबेने १५ डिसेंबर २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईत वन डे पदार्पण केले होते. त्यानंतर तो थेट २०२४ मध्ये दुसरी वन डे मॅच खेळण्यासाठी उतरला. दुसरा वन डे सामना खेळण्यासाठी त्याला १६९१ दिवसांची वाट पाहावी लागली आणि त्याने वन डेतील पहिली विकेटही आज मिळवली.

श्रीलंका - पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका, जनिथ लियानागे, वनिंद हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, अकिला धनंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद सिराज

भारत- रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh :  कर विभागात फील्डवर ‘अशा’ अधिकाऱ्यांचीच करा भरती; CM योगी आदित्यनाथ यांनी दिले कडक आदेश

Uttrakhand : उत्तराखंडची ही ठिकाणं पहाल तर स्वित्झर्लंड विसरून जाल; हे पाच सुंदर लोकेशन्स एकदा पहायलाच हवेत

Crime News : जळगाव-अजिंठा रोडवर गोळीबार: कुसुंबा गावात ८ ते १० जणांच्या टोळक्याची दहशत; दुचाकी दगडांनी ठेचली

Malegaon Nagarpanchyat Election : माळेगाव नगराध्यक्ष पदाचा पहिला मान ओबीसी महिलेला

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT