India Women vs Sri Lanka Women Asia Cup Final sakal
Cricket

IND w vs SL w : भारत आठव्यांदा विजेतेपद पटकावणार की श्रीलंका नवा चॅम्पियन होणार... किती वाजता रंगणार फायनलचा थरार?

India Women vs Sri Lanka Women Asia Cup Final : गतविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत वर्चस्व राखले असून रविवारी (ता. २८) त्यांची नजर आठव्या विजेतेपदावर असेल. गतविजेत्यांसमोर यजमान श्रीलंकेचे आव्हान असेल.

Kiran Mahanavar

India Women vs Sri Lanka Women Asia Cup Final : गतविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत वर्चस्व राखले असून रविवारी (ता. २८) त्यांची नजर आठव्या विजेतेपदावर असेल. गतविजेत्यांसमोर यजमान श्रीलंकेचे आव्हान असेल.

भारतीय महिलांनी स्पर्धेत दणदणीत विजयांची नोंद केली. पाकिस्तानला सात विकेटनी हरविल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीवर ७८ धावांनी, नेपाळवर ८२ धावांनी, तर बांगलादेशवर १० विकेट राखून सहज मात केली. भारताच्या आघाडीच्या बॅटर्स व गोलंदाजांनी स्पर्धेत शानदार कामगिरी केलेली आहे. सलामीची स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी दणकेबाजी फलंदाजी करताना १४०च्या स्ट्राईक रेटने शंभरहून जास्त धावा केल्या आहेत.

गोलंदाजीत दीप्ती शर्मा व रेणुका सिंग यांनी संघ व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार शानदार मारा केलेला आहे. दीप्ती हिने स्पर्धेत सर्वाधिक नऊ विकेट, तर रेणुकाने सात विकेट टिपल्या आहेत. दोघींची गोलंदाजी इकॉनॉमीही लक्षवेधक आहे. चारही सामन्यांत दीप्तीने ४.३७च्या, तर रेणुकाने ४.३१च्या इकॉनॉमीने यश प्राप्त केले आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव हिनेची चमकदार मारा करताना ५.५ इकॉनॉमी रेटने सहा गडी बाद केले आहेत.

कर्णधार हरमनप्रीत कौर व जेमिमा रॉड्रिग्ज यांना फलंदाजीत अपेक्षित संधी मिळालेली नाही. हरमनप्रीत तीन सामन्यांत दोन वेळा फलंदाजीस आली असून एका डावात तिने ६६ धावांची खेळी केली. जेमिमा हिला तिन्ही डावांत विशेष सूर गवसलेला नाही. संघाच्या सराव सत्रात नेट्समध्ये साऱ्याजणी मेहनत घेत आहेत. फलंदाजीत ज्यांना संधी मिळालेली नाही, त्या खेळाडूही वेळ येताच आक्रमक फलंदाजी करतील, असा विश्वास भारताची विकेटकिपर-बॅटर रिचा घोष हिने व्यक्त केला.

दुसरीकडे, श्रीलंकेचा संघही भारताप्रमाणे स्पर्धेत अपराजित आहे. त्यांनी मलेशियाविरुद्ध साखळी फेरीत १४४ धावांनी स्पर्धेतील सर्वांत मोठ्या विजयाची नोंद केली. कर्णधार चमारी अथापाथथू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून स्पर्धेत तिने सर्वाधिक २४३ धावा नोंदविल्या आहेत. तिचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या इतर बॅटर्सने अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. रुश्मी गुणरत्ने हिने ९१ धावांची नोंद केली आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांना अपेक्षित यश मिळालेले नाही. ऑफस्पिनर कविशा दिलहारी (५.३५च्या इकॉनॉमीने सात विकेट) हिचा अपवाद वगळता इतर गोलंदाज ठसा उमटवू शकलेले नाहीत.

सामन्याची वेळ : दुपारी तीन वाजल्यापासून

दोन्ही संघ

भारत ः हरमप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकिपर), उमा छेत्री (विकेटकिपर), पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, रेणुकासिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा सोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील, सजना सजीवन.

श्रीलंका ः चमारी अथापाथथू (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, ॲमा कांचना, उदेशिका प्रबोधिनी, विश्मी गुणरत्ने, काव्या कविंदी, इनोशी प्रियदर्शनी, सुगंदिका कुमारी, अचिनी कुलसुरिया, कविशा दिलहारी, नीलाक्षी डिसिल्वा, सचिनी निसान्साला, शाशिनी गिमहानी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT