India Cricket Team Sakal
Cricket

IND vs SL, 2nd ODI: श्रीलंकेने जिंकला टॉस! भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाकोणाला मिळाली संधी?

India vs Sri Lanka 2nd ODI Toss: भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आहे. दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs Sri Lanka 2nd ODI Playing XI: श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (4 ऑगस्ट) वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. कोलंबोला होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने पहिल्या सामन्याप्रमाणेच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होतील अशा चर्चा होत्या. मात्र, भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पहिल्या वनडे सामन्यात खेळलेला ११ जणांचा संघच दुसऱ्या सामन्यातही खेळताना दिसणार आहे.

दरम्यान, श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. श्रीलंकेने कामिंदू मेंडिस आणि देफ्री वाँडरसे यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यांना वनिंदू हसरंगा आणि मोहम्मद शिराझ यांच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.

श्रीलंका आणि भारत यांच्यात पहिला सामना बरोबरीत सुटला होता. श्रीलंकेने ५० षटकात ८ बाद २३० धावा केल्या होत्या, त्यानंतर भारतालाही ४७.५ षटकात सर्वबाद २३० धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे दोन्ही संघांना मालिकेत आघाडी घेता आली नव्हती.

आता दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची संधी दोन्ही संघांकडे असेल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

श्रीलंका: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Mohol News : शेततळ्यात पाय घसरून पडून विवाहितेचा मृत्यू

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड, प्रत्येक घडामोडीवर करडी नजर; 'असा' असेल प्लॅन

Maratha Reservation : मुंबई आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून तिघांची सायकलवारी

SCROLL FOR NEXT