Riyan Parag | India vs Sri Lanka 3rd ODI Sakal
Cricket

IND vs SL, 3rd ODI: रियान पराग पदार्पणात चमकला अन् फर्नांडोचं शतक हुकलं; श्रीलंकेचं भारताला 249 धावांचं लक्ष्य

India vs Sri Lanka: तिसऱ्या वनडेत भारताकडून पदार्पण करणाऱ्या रियान परागने त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केले, तर श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडोचं शतक थोडक्यात हुकलं.

Pranali Kodre

India vs Sri Lanka 3rd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका संघात तिसरा वनडे सामना बुधवारी खेळला जात आहे. कोलंबोला झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २४९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २४८ धावा केल्या आहेत. या सामन्यात श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडोचं शतक ४ धावांनी थोडक्यात हुकले, तर भारताकडून पदार्पण करणारा रियान परागही चमकला.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून पाथम निसंका आणि अविष्का फर्नांडो सलामीला फलंदाजीला आले होते. त्यांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी संयमी फलंदाजी करताना पहिल्या १९ षटकात भारताला मोठे यश मिळवून दिले नाही. त्यांनी सलामीला ८९ धावांची भागीदारी केली.

पण अखेर अक्षर पटेलने भारताला २० व्या षटकात ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने निसंकाला ४५ धावांवर बाद केले. पण त्यानंतरही फर्नांडोला कुशल मेंडिसने चांगली साथ दिली. त्यांच्या जोडीनेही अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे श्रीलंकेने १७० धावा सहज पार केले होते.

पण यावेळी कर्णधार रोहित शर्माने परागकडे चेंडू सोपवला. त्यानेही हा विश्वास कायम राखताना ३६ व्या षटकात फर्नांडोला पायचीत केले. त्यांमुळे फर्नांडोचं शतक थोडक्यात हुकले. तो १०२ चेंडूत ९६ धावा करून बाद झाला.

यानंतर परागने ३८ व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकालाही १० धावांवर पायचीत पकडले. त्याच्या पुढच्याच षटकात सदिरा समरविक्रमाला मोहम्मद सिराजने पायचीत केले. त्याला आधी पंचांनी नाबाद दिले होते. परंतु, डीआरएसमध्ये तो बाद असल्याचे दिसून आले.

यानंतर जनिथ लियानागे (८) आणि दुनिथ वेल्लालागे (२)यांच्या विकेट्स श्रीलंकेने झटपट गमावल्या. पण नंतर कामिंडू मेंडिसने कुशल मेंडिसला चांगली साथ दिली होती. कुशलने अर्धशतकही पूर्ण केले.

मात्र त्याला ४९ व्या षटकात कुलदीप यादवने शुभमन गिलच्या हातून झेलबाद केले. कुशल मेंडिसने ८२ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. अखेरीस कामिंडू मेंडिसने डाव सांभाळत श्रीलंकेला २४८ धावांपर्यंत पोहचवले. तो २३ धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून गोलंदाजी करताना रियान परागने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT