Hardik Pandya talk with Gautam Gambhir sakal
Cricket

IND vs SL : Hardik Pandya ची कॅप्टन सूर्यकुमारने बोलावलेल्या चर्चा सत्रात दांडी; गौतम गंभीरकडे गेला अन्...

India vs Sri lanka Tour : रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे जाणे अपेक्षित होते, परंतु नवीन कोच गौतम गंभीरने सूर्यकुमार यादवची निवड केली.

Swadesh Ghanekar

India vs Sri Lanaka Hardik Pandya vs Surya Kumar Yadav : भारतीय क्रिकेट संघात आता गौतम गंभीर पर्व सुरू झाले आहे. गौतम गंभीरच्या ( Gautam Gambhir ) मार्गदर्शनाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर दाखल झाला आणि काल खेळाडूंचे पहिले सराव सत्र पार पडले. सूर्यकुमार यादव याच्याकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोपवलं गेल्याने या दौऱ्यापूर्वी चर्चेला खतपाणी मिळाले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये उप कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला कॅप्टन का नाही केलं हे निवड समिती प्रमुख अजित आगरकरने सांगितलं खरं, परंतु चर्चा ती रंगणारच.

भारतीय ट्वेंटी-२०संघाचे २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेपूर्वी पहिले सराव सत्र पार पाडले. मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गंभीरचे भारतीय संघासोबतचे हे पहिले सत्र होते. यावेळी गंभीरच्या प्रत्येक हालचालीवर स्पॉटलाइट होता. त्याचवेळी हार्दिक हाही केंद्रस्थानी होताच. हार्दिकने श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर सूर्याला मिठी मारून त्याला कर्णधारपद न दिल्याचे दुःख नसल्याचे स्पष्ट केले. तरीही काल सराव सत्रात पहिल्या हर्डलमध्ये सूर्या खेळाडूंना संबोधित करत होता. पण, यावेळी हार्दिक तिथे न दिसल्याने पुन्हा एकदा वादाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हार्दिक तिथे का नव्हता, याचे कारण अद्याप माहित नाही. पण, हे चर्चासत्र झाल्यानंतर हार्दिक आला आणि त्याने सराव सत्रात सहभाग घेतला. यावेळी हार्दिक नवीन प्रशिक्षक गंभीरसोबत प्रदीर्घ काळ चर्चा करताना दिसला आणि त्याने गंभीरकडून बॅटिंग स्टान्सबाबत काही टिप्स घेतल्या. गंभीरच्या ट्वेंटी-२० क्रिकेटच्या स्कीम ऑफ थिंग्जमध्ये हार्दिक हा एक महत्त्वाचा सदस्य आहे. गंभीर हा हार्दिकसोबत ऑफ-ड्राइव्हवर काम करताना दिसत आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या ट्वेंटी-२० संघात सूर्याच्या नेतृत्वाखाली युवा ब्रिगेड मैदानावर उतरणार आहे. रोहित, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतली आहे. त्यांची रिक्त जागा भरण्याचे आव्हान या युवा संघासमोर असणार आहे.

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT