Team India new T20I jersey sakal
Cricket

IND vs SL Special Jersey: भारतीय संघाचे वाढले 'Star'! नवी जर्सी पाहून वाटेल अभिमान Video

Two-Star' Jersey For Team India vs Sri Lanka Series: भारत-श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला २७ जुलैपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे.

Swadesh Ghanekar

India new T20I jersey for Sri Lanka Tour: भारतीय संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) आणि नवीन कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार हा ट्वेंटी-२० संघाचा नवीन कर्णधार म्हणून समोर आला. त्याचवेळी राहुल द्रविड यांनीही वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कार्यकाळ वाढवण्यास नकार दिल्याने गौतम गंभीरची निवड झाली. भारतीय संघाच्या नव्या पर्वाला श्रीलंका दौऱ्यातून सुरूवात होत आहे आणि त्यात भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे.

नव्या दमाच्या खेळाडूंना सोबत घेऊन भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. रोहित, विराट व जड्डू यांची रिक्त झालेली जागा भरून काढण्याचे आव्हान या युवा खेळाडूंच्या खांद्यावर असणार आहे. यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल ही नवी जोडी सलामीला दिसेल, तर मधल्या फळीची जबाबदारी सूर्यकुमार, रियान पराग यांच्या खांद्यावर असेल. हार्दिक पांड्याकडून उप कर्णधारपद गेले असले तरी तो संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे, हे गौतमने स्पष्ट केले आहे. संजू सॅमसन व रिषभ पंत यांच्यात यष्टिरक्षक-फलंदाजाच्या जागेसाठी टक्कर पाहायला मिळू शकते.

दरम्यान, भारतीय संघ ट्वेंटी-२० मालिकेत नव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय संघाच्या जर्सीवर डाव्या बाजूला दोन स्टार दिसणार आहेत. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि तब्बल १४ वर्षांचा दुष्काळ संपवला. २००७ मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळेच आता टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० जर्सीवर दोन वर्ल्ड कपचे प्रतिक म्हणून दोन स्टार दिसणार आहेत.

Team India new T20I jersey for Sri Lanka Series

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेचा ट्वेंटी-२० संघ : चरिथ असलंका (कर्णधार), पथूम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, महेश थिक्षाना, चामिंडू विक्रमसिंघे, चमिंडू विक्रमसिंघे, मथिसा पथिराना, बिनुरा फर्नांडो, असिथा फर्नांडो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात पाणीटंचाईचा कळस! रागावलेल्या ग्रामस्थांचा मनसेसोबत मटकाफोड आंदोलन

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

SCROLL FOR NEXT