Team India Sakal
Cricket

IND vs ZIM, T20I: झिम्बाब्वेवरील विजय टीम इंडियासाठी ठरला ऐतिहासिक, आजपर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम केला नावावर

Most T20I Wins: भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात मिळवलेला विजय विश्वविक्रमी ठरला आहे. टी२० क्रिकेटमध्ये विजयांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया-इंग्लंड भारताच्या जवळपासही नाहीत.

Pranali Kodre

India vs Zimbabwe, 3rd T20I: भारतीय संघाने बुधवारी (१० जुलै) झिम्बाब्वेविरुद्ध टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यांत २३ धावांनी विजय मिळवला. हा विजय भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला आहे.

भारताचा हा टी२० क्रिकेटमधील १५० वा विजय होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५० विजय मिळवणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी कोणत्याच संघाला असा कारनामा करता आलेला नाही.

भारतीय संघाने आत्तापर्यंत २३० टी२० सामने खेळले असून यात १५० विजय मिळवण्याबरोबरच ६९ पराभव स्विकारले आहेत. तसेच ५ सामने बरोबरीत सुटले, तर ६ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ (१० जुलै २०२४ पर्यंत)

  • १५० विजय - भारत (२३० सामने)

  • १४२ विजय - पाकिस्तान (२४५ सामने)

  • १११ विजय - न्यूझीलंड (२२० सामने)

  • १०५ विजय - ऑस्ट्रेलिया (१९५ सामने)

  • १०४ विजय - दक्षिण आफ्रिका (१८५ सामने)

  • १०० विजय - इंग्लंड (१९२ सामने)

भारताचा विजय

दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १८२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने ४९ चेंडूत सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाडने ४९ धावा केल्या, तर यशस्वी जयस्वालने ३६ धावांची खेळी केली.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला २० षटकात ६ बाद १५९ धावा करता आल्या. झिम्बाब्वेकडून डायन मेयर्सने ४९ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. तसेच क्लाईव्ह मदांडे यांनी ३७ धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. आवेश खानने २ विकेट्स घेतल्या, तर खलील अहमदने १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय, पण ॲलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध

Stock Market IPO : या IPO ला तब्बल 1000 पट सब्स्क्रिप्शन; GMP मध्येही चमक, गुंतवणूकदारांना पैसा डबल करण्याची संधी?

Pune Election : तीन दिवसांत ६७२ अर्ज नेले; नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारांची गर्दी; मात्र प्रत्यक्षात फक्त एक अर्ज दाखल!

Ambegaon Political : युती-अनिश्चिततेत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बालाजीनगर प्रभागात पाचही जागा स्वबळावर लढवणार!

Latest Marathi News Live Update : बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणातील लुथरा ब्रदर्स यांच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT