Team India Sakal
Cricket

IND vs ZIM 3rd T20I: टीम इंडियात मोठे बदल; जयस्वाल, दुबे अन् सॅमसनचे प्लेइंग-11 मध्ये पुनरागमन; 'या' खेळाडूंचा पत्ता कट

India vs Zimbabwe, 3rd T20I: झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत.

Pranali Kodre

India vs Zimbabwe, 3rd T20I Playing XI: भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात तिसरा टी२० सामना हरारेमध्ये बुधवारी (१० जुलै) खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे.

याशिवाय खलील अहमदही प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. तसेच ध्रुव जुरेल, रियान पराग आणि साई सुदर्शन यांना आपली जागा सोडावी लागली आहे, तर मुकेश कुमारला विश्रांती देण्यात आली आहे.

पहिल्या दोन सामन्यांसाठी यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना टी२० वर्ल्ड कपनंतर विश्रांती देण्यात आली होती. पण तिसऱ्या सामन्यापूर्वी ते संघाशी जोडले गेले. त्यामुळे त्यांचे प्लेइंग इलेव्हनमध्येही पुनरागमन झाले आहे.

झिम्बाब्वे संघानेही प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. इनोसंट कैया हा दुखापतग्रस्त आहे, तर ल्युक जोंगवालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. झिम्बाब्वेने प्लेइंग इलेव्हनमध्ये तादिवानाशे मारुमणी आणि रिचर्ड एनगारावा यांना संधी दिली आहे.

दरम्यान, या मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याची संधी दोन्ही संघांना असणार आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

झिम्बाब्वे : तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (यष्टीरक्षक), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड एनगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा

भारत : यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार?

Navneet Rana: नवनीत राणा यांना बॉम्बने उडविण्याची धमकी; हैदराबादवरून रजिस्टर डाकेने आले पत्र

Solapur News: सोलापुरात आता रात्री २१ ठिकाणी ‘सरप्राईज’ नाकाबंदी; वाहतूक पोलिसही असणार मदतीला; चोरी, दरोड्याच्या घटना रोखण्यासाठी निर्णय

Women's World Cup Team: वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात हरमनप्रीत कौरला स्थान नाही; भारताच्या तीन खेळाडूंची निवड, कॅप्टन कोण?

फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली, व्यासपीठावर उडाला गोंधळ; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT