Team India | Test Cricket Sakal
Cricket

India Vs England Test Series 2025: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषित! जाणून घ्या कधी होणार सामने

India Tour Of England 2025, Test Series Schedule: भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Pranali Kodre

India Tour Of England 2025, Test Series: भारतीय संघ पुढीलवर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक इंग्लंड क्रिकेट आणि बीसीसीआयने घोषित केले आहे. ही मालिका २० जून ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान खेळवली जाणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी महिला आणि पुरुष संघांचे आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक घोषित केले. यामध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेचाही समावेश आहे. ही मालिका कसोटी चॅम्पिययनशीचाही भाग असणार आहे.

भारताचा इंग्लंड दौरा

या कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जूनला लीड्स येथे सुरू होईल. त्यानंतर २ जुलै रोजी बर्मिंगहॅमला दुसरा सामना सुरू होईल. तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार असून हा सामना १० जुलैला सुरू होईल. चौथा सामना मँचेस्टरला २३ जुलैला सुरू होणार आहे, तर अखेरचा सामना लंडनला ओव्हलवर ३१ जुलैला सुरू होईल.

हे पाचही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहेत.

भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक (कसोटी मालिका)

  • २० ते २४ जून - पहिला कसोटी सामना; हेडिंग्ले, लीड्स

  • २ ते ६ जुलै - दुसरा कसोटी सामना; एजबस्टन, बर्मिंगहॅम

  • १० ते १४ जुलै, तिसरा कसोटी सामना; लॉर्ड्स, लंडन

  • २३ ते २७ जुलै - चौथा कसोटी सामना; ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

  • ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - पाचवा कसोटी सामना; द किया ओव्हल, लंडन

इंग्लंडचा भारत दौरा

दरम्यान, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडला भारत दौऱ्यात वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत संघात ५ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना पुढच्यावर्षी भारत आणि इंग्लंड संघात मोठ्या चूरशीचे सामने पाहायला मिळण्याची अपेक्षा असेल.

इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक (वनडे आणि टी२० मालिका)

टी20 मालिका (वेळ - संध्या. ७.०० वाजता)

  • २२ जानेवारी - पहिला टी२०, चेन्नई

  • २५ जानेवारी - दुसरा टी२०, कोलकाता

  • २८ जानेवारी - तिसरा टी२०, राजकोट

  • ३१ जानेवारी - चौथा टी२०, पुणे

  • २ फेब्रुवारी - पाचवा टी२०, मुंबई

वनडे मालिका (वेळ - दु. १.३० वाजता)

  • ६ फेब्रुवारी - पहिला वनडे, नागपूर

  • ९ फेब्रुवारी - दुसरा वनडे, कटक

  • १२ फेब्रुवारी - तिसरा वनडे, अहमदाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT