David Johnson Sakal
Cricket

David Johnson: क्रिकेटविश्वात शोककळा! कुंबळेबरोबर खेळलेल्या टीम इंडियाच्या गोलंदाजाचे निधन

David Johnson Passed Away: भारताच्या 52 वर्षीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे निधन झाले असून अनिल कुंबळेनेही याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Pranali Kodre

David Johnson Passed Away: भारताचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे गुरुवारी (२० जून) निधन झाल्याचे समजत आहे. त्यांनी वयाच्या ५२ व्या वर्षीय बंगळुरूमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल सध्या भारतीय क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त होत आहे.

दरम्यान, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचे निधन झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यांना खाली पडल्यानंतर लगेचच हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले होते, मात्र त्यापुर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जॉन्सन यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.

वेगवान गोलंदाज असलेल्या जॉन्सन यांनी १९९६ साली भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. त्यांनी त्यावर्षीय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामने खेळले. त्यांनी २ कसोटीत ३ विकेट्स घेतल्या.

त्यांची भारतासाठी मोठी कामगिरी नसली, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी शानदार कामगिरी केली होती. त्यांनी १९९५-९६ मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी केरळविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये नोंदवली.

कर्नाटककडून खेळणाऱ्या डेव्हिड जॉन्सन यांनी त्यावेळी १५२ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत ३९ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यामध्ये त्यांनी १२५ विकेट्स घेतल्या आणि ४३७ धावा केल्या. तसेच ३३ लिस्ट ए सामन्यांमध्ये ४१ विकेट्स घेतल्या.

त्यांच्या निधनाबद्दल माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेनेही शोक व्यक्त केला असून ट्वीट केले आहे की 'माझा क्रिकेटमधील सहकारी डेव्हिड जॉन्सनचे निधन झाल्याचे ऐकून वाईट वाटलं. त्याच्या कुटुंबाप्रती माझी सहानुभूती आहे. बेन्नी लवकर गेलास.'

याशिवाय बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले, 'भारताचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सनच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराप्रती माझ्या सहानुभूती आहेत. खेळात असलेले त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहिल.'

डेव्हिड जॉन्सन हे जेव्हा खेळायचे, तेव्हा भारतीय संघात अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद असे गोलंदाज होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT