MS Dhoni Sakal
Cricket

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

MS Dhoni Records: एमएस धोनीच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या आकडेवारीचा घेतलेला आढावा

सकाळ डिजिटल टीम

MS Dhoni: महेंद्रसिंह धोनी ७ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीने त्याच्या कारकिर्दीत मोठे यश संपादन केले आहे. तो भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा एकमेव कर्णधार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०२० मध्ये निवृत्तीची घोषणा केली. पण असे असले तरी त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले आहे.

धोनीने डिसेंबर २००४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००७ साली तो पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार झाला.

त्याच्या काहीच वर्षात त्याच्यावर वनडे आणि कसोटी कर्णधारपदाचीही जबाबदारी आली. त्याने या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडताना भारताला मोठे विजय मिळवून दिले. त्याने आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सांभाळताना ५ वेळा विजेतेपद जिंकले.

त्याच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या आकडेवारीचा आढावा घेऊ.

  • सर्वात जास्त ६० कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षक असणारा कर्णधार

  • वनडेत एकाच डावात यष्टीरक्षक म्हणून ६ बळी

  • सर्वाधिक २०० वनडे सामन्यांमध्ये यष्टीरक्षक असणारा एकमेव कर्णधार

  • वनडेतील एकाच डावात ३ स्टंपिंग.

  • आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत एका डावात यष्टीरक्षक म्हणून ५ बळी

  • सर्वात जास्त ७२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत यष्टीरक्षक असणारा कर्णधार.

  • आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत सर्वात जास्त ३४ स्टंपिंग.

  • कर्णधार म्हणून सर्वाधिक ३३२ आंतरराष्ट्रीय सामने

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त १९५ स्टंपिंग

कर्णधार म्हणून अशी आकडेवारी

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून एकून ६० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये २८ सामने जिंकले, तर १८ गमावले. तसेच १५ सामने अनिर्णित राहिले.

याशिवाय वनडेत २०० सामन्यांत कर्णधार म्हणून खेळला असून, ज्यात भारतीय संघाने ११० सामने जिंकले, तर ७४ गमावले. त्याचबरोबर ५ सामने बरोबरीत सुटले, तर ११ सामन्यांचा निकाल लागला नाही.

तसेच, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७२ सामन्यात ४२ सामने जिंकले, तर २८ गमावले. तसेच १ सामना बरोबरीत सुटला आणि २ सामन्यांचा निकाल लागला नाही.

अशी आहे आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२००४ पासून ते २०१९ पर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत धोनीने ९० कसोटी, ३५० एकदिवसीय सामने आणि ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळले आहेत. कसोटीच्या १४४ डावांमध्ये ३७.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या.

याशिवाय वनडे सामन्यात ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या, तर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३७.६० ची सरासरी आणि १२६.१३ च्या स्ट्राईक रेटने १६१७ धावा बनवल्या. धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १६ शतके तर १०८ अर्धशतक केली आहेत.

याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने यष्टीरक्षक म्हणून ८२९ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! महागाई भत्त्यामध्ये तब्बल ८ टक्के वाढ

UPI Payment: आता केवळ मोबाईल फोनवरूनच नव्हे तर कार आणि स्मार्टवॉचवरूनही यूपीआय पेमेंट करता येणार, आरबीआयची मोठी घोषणा

MLA Jayant Patil : आपलं नाव ऐकलं नाय, असं याक भी गाव नाय, आणि सगळ्यांना नाय हाणलं तर जयंत पाटील नाव नाय...; गोपीचंद पडळकर यांच्यावरील टीकेला दिले प्रत्त्युत्तर

जेव्हा जोडी नं 1 च्या सेटवर भडकलेल्या संजय दत्तने सगळ्यांसमोर शिव्या घातल्या; गोविंदा ठरला कारण !

Latest Marathi News Live Update : शाळा महाविद्यालयांमध्ये 'NSS' आणि 'NCC'च्या धर्तीवर पर्यावरण रक्षक दल

SCROLL FOR NEXT