Hardik replaced as vice-captain sakal
Cricket

India squad Announced for SL Tour : तेल गेले, तूप गेले...! Hardik Pandyaची अशी अवस्था, शुभमन गिलला लॉटरी

Hardik Pandya - २०२६ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने पाऊलं उचलताना बीसीसीआयने आज मोठा निर्णय घेतला.

Swadesh Ghanekar

India T20I Squad for Sri Lanka tour: श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ट्वेंटी-२० व वन डे मालिकेसाठी बीसीसीआयने गुरुवारी संघांची घोषणा केली. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून समोर आला. रोहित शर्माने वन डे मालिकेत खेळण्याची तयारी दाखवल्याने तोच कर्णधार असेल. पण, या सर्व संघ निवडीत हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याची अवस्था तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले! अशी झालीय..

रोहित शर्मा व विराट कोहली यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची इच्छा पूर्ण केली आणि वन डे मालिकेत खेळण्याची तयारी दाखवली. त्यामुळे रोहितकडे वन डे संघाचे नेतृत्व कायम राहिले. त्याचवेळी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार हे नाव उदयास आले. उप कर्णधार हार्दिक पांड्याच्या कर्णधार बनण्याच्या आशा मावळल्या. त्याचवेळी त्याला उप कर्णधारपदही गमवावे लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात नेतृत्व करणारा शुभमन गिल हा टीम इंडियाच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाचा उप कर्णधार म्हणून समोर आला आहे.

India squad Announced for SL Tour hardik pandya
  • संघ निवडीतील काही ठळक मुद्दे

  • हर्षित राणा व रियान पराग यांना वन डे संघात पदार्पणाची संधी मिळणार आहे.

  • ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा यांना ट्वेंटी-२० संघात स्थान मिळालेले नाही

  • रवींद्र जडेजा वन डे संघाचा सदस्य नाही, त्याच्याजागी वॉ़शिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे

  • हार्दिक पांड्याने ट्वेंटी-२० संघात स्थान टिकवले आहे, परंतु वन डे संघातून तो गायब आहे

  • रोहित शर्मा, विराट कोहली व कुलदीप यादव वन डे संघात आहेत

  • जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या दौऱ्यावर विश्रांती दिली गेली आहे

  • रियान पराग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल, शिवम दुबे, खलिल अहमद, रिषभ पंत, अर्शदीप सिंग यांचा वन डे व ट्वेंटी-२० संघातही समावेश आहे.

भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

भारताचा ट्वेंटी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : महायुती सरकारचा 'आनंदाचा शिधा' बंद शक्यता, कारण काय?

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

SCROLL FOR NEXT