Team India Sakal
Cricket

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी कधी होणार टीम इंडियाची निवड अन् नव्या T20 कर्णधाराची घोषणा? जाणून घ्या अपडेट्स

India tour of Sri Lanka: जुलैच्या अखेरीस सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा कधी होऊ शकते, याबाबत नवे अपडेट समोर आले आहेत.

Pranali Kodre

India Squad Selection for Sri Lanka Tour Updates: भारतीय क्रिकेट संघाला जुलैच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

या दौऱ्यासाठी बुधवारी (१७ जुलै) भारतीय संघाच्या निवड समितीची बैठक होणार होती. मात्र आता काही मिडिया रिपोर्ट्सनुसार ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता ती गुरुवारी (१८ जुलै) होण्याची शक्यता आहे. कारण यानंतर १९ ते २२ जुलै दरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह हे श्रीलंकेमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीसाठी उपस्थित असतील.

दरम्यान, आता नव्या अपडेटनुसार जर गुरुवारी बैठक झाली, तर श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणाही लगेच केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या या दौऱ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ते टी२० मालिकेत नसतील, हे स्पष्ट आहे.

मात्र श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत ते खेळणार की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यामुळे याबाबतही निवड समितीच्या बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होईल. इतकंच नाही, तर रोहितच्या टी२० निवृत्तीमुळे भारताला टी२०संघासाठी दुसऱ्या कर्णधाराचीही गरज असणार आहे.

सध्या अशी चर्चा आहे की २०२६ टी२० वर्ल्ड कपपर्यंत नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचा सूर्यकुमार यादवकडे भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद देण्याच्या विचारात आहे.

याशिवाय जर रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही जर उपलब्ध नसेल, तर त्याच्याऐवजी भारताच्या वनडे संघाचं नेतृत्व कोण करणार असाही एक प्रश्न आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल वनडे कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहेत.

त्यामुळे या सर्वच प्रश्नांची उत्तरं श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर सुटण्याची शक्यता आहे.

श्रीलंका दौऱ्यातील टी२० मालिकेतील सामने अनुक्रमे २७, २८ आणि ३० जुलै दरम्यान खेळवले जाणार आहे. तसेच वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे २, ४ आणि ७ ऑगस्ट दरम्यान खेळवले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT