Team India Sakal
Cricket

IND vs SL: भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील वनडे अन् टी20 सामन्यांच्या तारखा बदलल्या, जाणून घ्या नवं शेड्युल

India tour of Sri Lanka 2024: जुलैच्या अखेरीस भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यातील सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Pranali Kodre

India Tour of Sri Lanka: भारतीय संघ जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला तीन टी२० आणि तीन वनडे सामने खेळायचे आहेत. या मालिकांचे वेळापत्रक यापूर्वीच घोषित झाले होते. मात्र, आता त्यात पुन्हा बदल करण्यात आले आहे.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार २६ जुलैपासून टी२० मालिका सुरू होणार होती, तर १ ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होणार होती. मात्र आता बदललेल्या वेळापत्रकानुसार टी२० मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होईल, तर २ ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होईल.

टी२० मालिकेतील प्रत्येक सामन्याची तारीख एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे.

बदललेल्या वेळापत्रकानुसार २७, २८ आणि ३० जुलै या तीन दिवशी अनुक्रमे टी२० मालिकेतील पहिला, दुसरा आणि तिसरा सामना होईल.

टी२० मालिकेतील सर्व सामने पाल्लेकेले येथे होतील. त्याचबरोबर वनडे मालिकेतील पहिला, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी खेळवले जाणार आहेत. वनडे मालिकेतील सर्व सामने कोलंबोमध्ये होणार आहेत

भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. हा दौरा १४ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल, या दौऱ्यातही काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची निवड करण्यात येईल.

टी-२० मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामने सुरू होतील)

  • पहिला सामना - २७ जुलै.

  • दुसरा सामना - २८ जुलै

  • तिसरा सामना - ३० जुलै

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामने सुरू होतील.)

  • पहिला सामना - २ ऑगस्ट

  • दुसरा सामना - ४ ऑगस्ट

  • तिसरा सामना - ७ ऑगस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT