U19 India Team Sakal
Cricket

IND vs AUS U19 Test: चेन्नई कसोटीत भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय

India vs Australia U19: भारतीय १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाविरुद्ध चेन्नईला झालेल्या तीन दिवसीय कसोटी सामन्यात विजय मिळवला.

सकाळ वृत्तसेवा

U19 India vs U19 Australia: अतिशय संयमी आणि दडपणाचा समर्थपणे सामना करत निखिल कुमारने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाचा तीन दिवसांच्या क्रिकेट सामन्यात दोन विकेटने पराभव केला.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या निखिल कुमारने नाबाद राहत ७१ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला आजच्या अखेरच्या दिवशी अखेरच्या तासाभराचा खेळ शिल्लक असताना विजय मिळवता आला.

भारतीय संघाच्या या विजयात लेग स्पिनर मोहम्मद इनामनेही मोलाची कामगिरी केली. त्याने ७९ धावांत सहा विकेट मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २१४ धावांत गुंडाळता आला. आज ऑस्ट्रेलियाने चार बाद ११० धावांरून खेळ सुरू केला होता.

भारताला विजयासाठी २१२ धावांचे आव्हान मिळाले होते, परंतु खेळपट्टी फलंदाजीस पोषक नसल्यामुळे हे आव्हान सोपे नव्हते. त्यातच भरवशाचा वैभव सूर्यवंशी लवकर बाद झाला. त्यानंतर नित्या पांड्या (५१) आणि केपी कार्तिकेय (३६) यांनी ७१ धावांची भागीदारी करून डाव सावरला, परंतु हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्यावर भारताची घसरगुंडी उडाली होती.

बघता बघता भारताची सात बाद १६७ अशी अवस्था झाल्यावर निखिल कुमारने समर्थ नागराजसह आठव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघ, पहिला डाव : २९३ आणि दुसरा डाव २१४.

भारत १९ वर्षांखालील संघ, पहिला डाव : २९६ अणि दुसरा डाव ८ बाद २१४ (नित्या पांड्या ५१, निखिल कुमार नाबाद ५५, एडेन ऑकनिर ४/२७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT