IND vs BAN stats esakal
Cricket

IND vs BAN Records : भारत-बांगलादेश पहिल्या कसोटीत नोंदवले गेले ९ भारी विक्रम, R Ashwin ने वर्ल्ड रेकॉर्ड केला

IND vs BAN 1st Test Stats : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई कसोटीत एकूण ९ भारी विक्रमांची नोंद झाली.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 1st Test records : शतक अन् सहा विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या R Ahswin ने चेन्नई कसोटी गाजवली. ऋषभ पंत व शुभमन गिल यांच्या शतकांनीही भारताच्या दणदणीत विजयात हातभार लावला.

३७

आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम ३७ वेळा केला आणि त्याने या विक्रमात शेन वॉर्नसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले. मुथय्या मुरलीधरन ( ६७) अव्वल आहे.

ऋषभ पंतने कसोटी पुनरागमन करताना सहावे शतक झळकावले. त्याने भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी याच्या ६ कसोटी शतकांशी बरोबरी केली.

IND vs BAN stats

३८ वर्ष, २ दिवस

आर अश्विन हा कसोटीच्या एका डावात पाच विकेट्स घेणारा भारताचा वयस्कर गोलंदाज बनला आहे. यापूर्वी विनू मंकड यांनी १९५५मध्ये पाकिस्तानविरुद्ध पेशावर कसोटीत ३७ वर्ष व ३०६ दिवसांचे असताना असा पराक्रम केला होता.

एकाच मैदानावर पाच विकेट्स व शतक अशी दोनवेळा कामगिरी करणारा आर अश्विन हा जगातील पहिलाच खेळाडू बनला आहे. यापूर्वी त्याने २०२१ मध्ये चेपॉकवर इंग्लंडविरुद्ध असा पराक्रम केला होता.

IND vs BAN stats

आर अश्विन एकाच कसोटीत शतक व डावातत पाच विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम पॉली उम्रीगर ( ३६ वर्ष व ७ दिवस) यांच्या नावावर होता. त्यांनी १९६२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत नाबाद १७२ धावा केल्या होत्या आणि डावात पाच विकेट्स टिपल्या होत्या.

आर अश्विनने एकूण चार वेळा कसोटीत शतक अन् डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. इयान बॉथम यांनी पाचवेला अशी कामगिरी केली आहे. गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक कॅलिस, शाकिब अल हसन आणि रवींद्र जडेजा यांनी दोनवेळा अशी कामगिरी केली.

IND vs BAN stats

आर अश्विनने कसोटीच्या चौथ्या डावात ७ वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. शेन वॉर्न व मुरलीधरन यांच्यासह तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. रंगना हेरथने १२ वेळा असा पराक्रम केला आहे.

१२

रवींद्र जडेजाने १२ वेळा एकाच कसोटीत ५०+धावा आणि पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या लिस्टमध्ये इयान बॉथम ( १६) आघाडीवर आहेत. अश्विन व शाकिब यांनी ११ वेळा अशी कामगिरी केली आहे.

IND vs BAN stats

१७९-१७८

भारतीय संघाच्या कसोटी इतिहासात प्रथमच विजयाची संख्या ही पराभवापेक्षा जास्त झाली आहे. बांगालदेशला पराभूत करून भारताने जय-पराजयाची आकडेवारी १७९-१७८ अशी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT