IND vs BAN 2nd Test eskal
Cricket

IND vs BAN 2nd Test : दुसऱ्या दिवसावर पडलं पावसाचं पाणी, भारतात ९ वर्षांनी पहिल्यांदाच असं झालंय

IND vs BAN 2nd Test: भारत-बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

India vs Bangladesh 2nd Test match at Kanpur: भारत विरुद्ध बांगलादेश संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला.

कानपूरमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस असल्यामुळे ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि ३५ षटकांचा खेळ संपल्यानंतर पावसामुळे पुढील खेळ रद्द करावा लागला. यापूर्वी भारतात २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पूर्ण दिवसाचा खेळ रद्द करावा लागला होता. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पावसामुळे सामना अनिर्णित राहिला होता.

बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ५९ षटकांत सर्व विकेट्स गमावत २१४ धावा केल्या. भारताने २२ षटकात ८० धावा केल्या होत्या पण त्यानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना अनिर्णित घोषित करावा लागला.

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यातील दुसऱ्या दिवशी ११:१५ च्या सुमारास पाऊस थांबला होता. परंतु अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे २:१५ वाजता खेळ रद्द करावा लागला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारीही पावसाची शक्यता आहे, परंतु सोमवारी आणि मंगळवारी आकाश मोकळे असण्याची शक्यता आहे.

पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ झाला. बांगलादेशने पहिल्या दिवशी ३ विकेट्स गमावत १०७ धावा उभारल्या. भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने बांगलादेशचे सलामीवीर झाकीर हसन आणि शादमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT