IND vs BAN 2nd Test esakal
Cricket

IND vs BAN 2nd Test : टीम इंडियाचे 'कसोटी' ४ वर्ल्ड रेकॉर्ड! जगात असा भारी खेळ कोणाला जमणार नाही

IND vs BAN 2nd Test: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत आक्रमक फटकेबाजी केली आणि बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगले झोडून काढले.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : भारत-बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीची दोन दिवस पावसामुळे वाया गेली. अखेर आज चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली आणि बांगलादेशचा संघ २३३ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करताना तीन मोठे वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केले.

मोमिनूल हकने १९४ चेंडूंत १७ चौकार व १ षटकारासह १०७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार नजमूल होसैन शांतो ( ३१) हा बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, आकाश दीप व आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

रवींद्र जडेजाची एक विकेट अन् घडला इतिहास...

रवींद्र जडेजाने एक विकेट घेऊन कसोटीतील ३०० विकेट्सचा टप्पा गाठवा. रंगना हेरथ ( ४३३), डॅनिएल व्हिटोरी ( ३६२) यांच्यानंतर कसोटीत ३०० विकेट्स घेणारा तिसरा डावखुरा फिरकीपटू आहे. कसोटीत २५ + फिफ्टी प्लस धावा आणि ३०० विकेट्स घेणारा तो कपिल देव, इयान बॉथम, डॅनिएल व्हिटोरी यांच्यानंतर चौथा खेळाडू ठरला. ३०० विकेट्स व ३०००+ धावा करणारा तो कसोटीतील चौथा अष्टपैलू खेळाडू आहे. जडेजाने ३१२२ धावा व ३०० विकेट्स अशी कामगिरी कसोटीत केली आहे. व्हिटोरी, आर अश्विन, शेन वॉर्न हे या विक्रमात पुढे आहेत.

टीम इंडियाची विश्वविक्रमी कामगिरी

बांगलादेशच्या पहिल्या डावातील २३३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी ३ षटकांत फलकावर पन्नास धावा चढवल्या आणि कसोटीतील ही वेगवान फिफ्टी ठरली. याचवर्षी २०२४ मध्ये इंग्लंडने नॉटिंगहॅममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ४.२ षटकांत अर्धशतक झळकावले होते.

रोहितने त्याच्या खेळीची सुरूवात दोन सलग षटकारांनी केली. फॉली विलियम ( १९४८), सचिन तेंडुलकर ( २०१३) व उमेश यादव ( २०१९) यांनी असा पराक्रम केला होता. जलद अर्धशतकानंतर भारताने वेगवान शतकही झळकावले. भारताने आज १०.१ षटकांत तिहेरी धावसंख्या उभी केली आणि स्वतःचाच ( १२.२ षटकं वि. वेस्ट इंडिज) विक्रम मोडला.

रोहित शर्मा ११ चेंडूंत २३ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर आलेल्या शुभमन गिलनेही ३६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३९ धावा केल्या. रिषभ पंत ( ९) ला धावांचा वेग वाढवण्यासाठी पाठवले गेले, परंतु त्याला शाकिब अल हसनने माघारी पाठवले. यशस्वी जोरदार फटकेबाजी करत राहिला. पण, तो ५१ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारासह ७२ धावांची खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे भारताने १८.२ षटकांत १५० धावा फलकावर चढवल्या आणि त्या कसोटीतील वेगवान दीडशतकी धावा ठरल्या. भारताच्या २४ षटकांत ४ बाद १९४ धावा झाल्या आहेत. भारताने २४.२ षटकांत २०० धावांचा टप्पा ओलांडला आणि हाही वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT