Jasprit bumrah  esakal
Cricket

IND vs BAN 2nd Test : ना मुन्ना, ना...! Jasprit Bumrah चा इन स्वींग सोडण्याची चूक अन् दांड्या गुल Video

IND vs BAN 2nd Test: कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या ३५ षटकानंतर थेट चौथ्या दिवशी ३६वे षटक पडले.. पावसामुळे या कसोटीचा बराचसा खेळ वाया गेला आहे.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : भारत-बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली आणि अखेर खेळ सुरू झाला. पहिल्या दिवसाचा खेळ ३५ षटकांनंतर थांबवण्यात आला होता. त्यानंतर दुसरा व तिसरा दिवस पूर्णपणे पावसामुळे वाया गेला होता. चौथ्या दिवशी तरी खेळ होईल अशी अपेक्षा घेऊन चाहते ग्रीन पार्क स्टेडियमवर आले होते आणि त्यांची अपेक्षा पूर्ण झाली. त्यात Jasprit Bumrah ने कमालीचा चेंडू टाकून बांगलादेशच्या फलंदाजाला माघारी पाठवले.

भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. आकाश दीपने दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवली. जाकीर हसनला भोपळ्यावर बाद केल्यानंतर आकाशने त्याच्या पुढच्या षटकात शादमन इस्लामला २४ धावांवर माघारी पाठवले. दोन्ही सलमावीर २९ धावांवर तंबूत परतल्यानंतर मोमिनूल हक व कर्णधार नजमूल होसैन शांतो यांनी डाव सावरला होता. पण, पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर आर अश्विनने ही जोडी तोडली. शांतोला त्याने ३१ धावांवर पायचीत केले.

पहिल्या दिवसाचा खेळ ३ बाद १०७ धावांवर थांबवण्यात आला आणि त्यानंतर खेळ थेट चौथ्या दिवशी सुरू झाला. पावसामुळे कानपूरचे मैदान सुकवण्यात ग्राऊंड्समनची दमछाक झालेली पाहिली. येथील ड्रेनेज सिस्टम चांगली नसल्याने दोन्ही दिवसाचा खेळ वाया गेला. पण, आज चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली आणि मैदानही खेळण्यास योग्य राहिले.

प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने चौथ्या दिवसाच्या पाचव्या षटकात मुश्फीकर रहिमचा ( ११) त्रिफळा उडवला. रहिमने आत येणारा चेंडू सोडण्याची चूक केली आणि जसप्रीतने त्रिफळा उडवून बांगलादेशला चौथा धक्का दिला. ४०.२ षटकांत बांगलादेशची अवस्था ४ बाद ११२ अशी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मेकअप उतरवल्यावर' केवळ आत्मचरित्र नव्हे... लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णीच्या संवेदनशील लेखनाचे रसिकांना आकर्षण

Diabetes & Brain Health: मधुमेहामुळे वाढतोय मेंदूच्या कवटीच्या भागात हाडाचा संसर्ग; 'मेंटकॉन' परिषदेत ENT तज्ज्ञांचा इशारा

Womens World Cup 2025: इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय, नॅट स्किव्हर ब्रंटचे शतक

Pune Crime News : स्कूलबसचालकाने भर रस्त्यात केली टेम्पोची तोडफोड, पुणे पोलिसांनी शिकवला कायमचा धडा; गुडघ्यावर बसवत काढली धिंड, पाहा VIDEO

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी १०० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेताच भडकला चीन, जागतिक मंदीची शक्यता

SCROLL FOR NEXT