India vs Bangladesh 2nd test day 3 X/BCCI
Cricket

IND vs BAN, 2nd Test: मैदान खेळण्यास तयार नाही! तिसऱ्या दिवसाचा खेळही झाला रद्द; BCCI ने दिले अपडेट्स

India vs Bangladesh, 2nd Test, 3rd Day Update: भारत विरुद्ध बांगलादेश संघात कानपूरला सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवसही रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशीही एकाही चेंडूचा खेळ झाला नव्हता.

Pranali Kodre

India vs Bangladesh, 2nd Test: भारत आणि बांगलादेश संघात होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात पावसामुळे मोठा अडथळा आला आहे. शुक्रवारपासून कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात पहिल्या दिवसापासून पावसाचा अडथळा आला आहे.

आता पहिल्या दोन दिवशी जोरदार पाऊस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मैदान ओले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशी मैदान खेळण्यासाठी योग्यप्रकारे न सुकल्याने या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात आत्तापर्यंत केवळ ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला आहे.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे पावसामुळे दुसऱ्या दिवशीही एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. त्याआधी पहिल्या दिवशी पावसामुळे नाणेफेकीलाही उशीर झाला होता. उशीराने झालेली नाणेफेक भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशकडून झाकिर हसन आणि शादमन इस्लाम हे सलामीला उतरले. त्यांनी संयमी सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. पण झाकिर २४ चेंडू खेळल्यानंतरही एकही धाव न करताच बाद झाला. त्यानंतर शादमनही ३६ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. दोघांनाही आकाश दीपने बाद केले.

यानंतर मोमिनुल हक आणि कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. मात्र २९ व्या षटकात शांतोला आर अश्विनने बाद केले. शांतोने ५७ चेंडूत ३१ धावा केल्या.

पण त्यानंतर काही वेळातच कमी सूर्यप्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आणि नंतर जोरदार पावसालाही सुरुवात झाली. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळही ३५ षटकांनंतर थांबण्यात आला. त्यावेळी मोमिनुल ४० धावांवर, तर मुश्फिकूर रहिम ६ धावांवर नाबाद होता. तसेच बांगलादेशने ३५ षटकात ३ बाद १०७ धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT