IND vs BAN 2nd Test eskal
Cricket

IND vs BAN, 2nd Test: तिसऱ्या दिवसाच्या खेळावरही पावसाचं पाणी पडणार? BCCI ने दिले अपडेट्स

India vs Bangladesh, 2nd Test, 3rd Day Update: भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर सध्या पावसाचे सावट आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळही वेळेत सुरू होऊ शकलेला नाही.

Pranali Kodre

India vs Bangladesh, 2nd Test: शुक्रवारपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू झाला आहे. मात्र या सामन्याच्या पहिल्या दिवसापासून या सामन्यावर पावसाचे सावट आहे. शनिवारी तर संपूर्ण दिवसात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता.

आता रविवारीही पावसामुळे मैदान ओले असल्याने निर्धारित वेळेत सामना सुरू होऊ शकलेला नाही. आता बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार दुपारी १२ वाजता सामनाधिकारी मैदान खेळण्यासाठी योग्य आहे की नाही ही तपासणी करतील आणि त्यानंतर पुढील अपडेट्स देतील.

या सामन्यात पहिल्या दिवशी पावसामुळे ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तर संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. दरम्यान, पहिल्या दिवशीही पावसामुळे नाणेफेकही उशीरा झाली होती. त्यावेळी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

बांगलादेशकडून झाकिर हसन आणि शादमन इस्लाम यांनी सलामीला फलंदाजीला उतरत सुरूवात संयमी केली होती. पण आकाश दीपने आधी २४ चेंडूत शून्य धावेवर असलेल्या झाकिरला बाद केले.

त्यानंतर त्याने ३६ चेंडूत २४ धावा करणाऱ्या शादमन इस्लामला पायचीत पकडलेय पण त्यानंतरही मोमिनुल हक आणि कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण अखेर शांतोला आर अश्विनने पायचीत केले. शांतोने ५७ चेंडूत ३१ धावांची खेळी केली.

यानंतर मोमिनुलला साथ देण्यासाठी मुश्फिकुर रहिम आला होता. ते फलंदाजी करत असतानाच कमी सूर्यप्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. त्यानंतर लगेचच पावसाने जोरही पकडला. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळही ३५ षटकांनंतर थांबण्यात आला.

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना भारताने २८० धावांनी जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघ सध्या या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता भारताने जर दुसरा सामना जिंकला किंवा अनिर्णित राखला, तरी ते मालिका जिंकतील.तसेच बांगलादेशने जर हा सामना जिंकला, तर मालिका बरोबरीत सुटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT