ROHIT SHARMA STUNNER esakal
Cricket

IND vs BAN 2nd Test: नाद खुळा...! Rohit Sharma ने एका हाताने टिपलेला अफलातून कॅच पाहिलात का? सारेच थक्क Video

Latest Sports Updates in Marathi: दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर अखेर चौथ्या दिवशी क्रिकेट चाहत्यांना खेळ पाहायला मिळाला...

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates: भारत-बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीची दोन दिवस पावसामुळे वाया गेली. अखेर आज चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली आणि अखेर खेळ सुरू झाला. Jasprit Bumrah आणि मोहम्मद सिराज यांनी पहिल्या सत्रात बांगलादेशला धक्के दिले. सिराजच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने ( Rohit Sharma Catch ) घेतलेला अविश्वसनीय झेल मन जिंकणारा ठरला.

भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. आकाश दीपने बांगलादेशचे सलामीवीर जाकीर हसन ( ०) आणि शादमन इस्लाम ( २४) यांना माघारी पाठवले. मोमिनूल हक व कर्णधार नजमूल होसैन शांतो यांनी डाव सावरला होता. पण, आर अश्विनने ही जोडी तोडली. शांतोला त्याने ३१ धावांवर पायचीत केले. पहिल्या दिवसाचा खेळ ३ बाद १०७ धावांवर थांबवण्यात आला आणि त्यानंतर खेळ थेट चौथ्या दिवशी सुरू झाला.

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमचीड्रेनेज सिस्टम चांगली नसल्याने दोन्ही दिवसाचा खेळ वाया गेला. पण, चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि बुमराहने पाचव्या षटकात मुश्फीकर रहिमचा ( ११) त्रिफळा उडवला. त्यानंतर सिराजने बांगलादेशचा पाचवा धक्का दिला. ३१ चेंडूंत १३ धावा करणारा लिटन दास झेलबाद झाला. रोहितने मिड ऑफला हवेत झेप घेत एका हाताने अफलातून कॅच घेतला. बांगलादेशचा निम्मा संघ १४८ धावांत तंबूत परतला आहे.

आर अश्विनच्या गोलंदाजीवर बांगलादेशला मोठा धक्का बसला. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा शाकिब अल हसनचा हा शेवटचा सामना ठरू शकतो. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, तो १७ चेंडूंत ९ धावांवर माघारी परतला. यावेळी मोहम्मद सिराजने अफलातून झेल टिपला आणि बांगलादेशला १७० धावांवर सहावा धक्का बसला. भारतीय संघ आजच पाहुण्यांचा पहिला डाव गुंडाळण्याच्या तयारीत दिसतोय..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Reel star Akkya Bansode: “थांब, तुझा आज गेमच करतो...” पुण्यात रिल स्टारवर धारधार शस्त्राने कसा झाला हल्ला, कोण आहे अक्क्या बनसोडे?

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

SCROLL FOR NEXT