ben stokes
ben stokes  esakal
क्रिकेट

IND vs ENG 4th Test Ranchi Pitch : खेळपट्टी पाहून बेन स्टोक्स हादरला; रांची पिचचं कोडं काही उलगडेना?

अनिरुद्ध संकपाळ

India vs England 4th Test Ranchi Pitch Report : भारताने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतल्यानंतर रांची कसोटीबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

राजकोट कसोटीत भारताने 434 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता रांचीमध्ये फिरकीला पोषक खेळपट्टीने इंग्रजांचे स्वागत होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ब्रेक दिल्यानंतर भारताची मदार फिरकीवरच असेल.

रांचीची खेळपट्टीचे चरित्र हे दुहेरी असणार आहे. खेळट्टीचा अर्धा भाग हा फिरकीला साथ देणार असेल तर दुसऱ्या भागात कोणतेही गवत नाही. तसेच खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर क्रॅक देखील आहेत. ही खेळपट्टी पाहून इंग्लंडचा कर्णधार तर हादरलाच!

बेन स्टोक्स खेळपट्टीचं वर्णन करताना म्हणाला की, 'मी अशा प्रकारची खेळपट्टी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. मला याबाबत काही कल्पना नाही त्यामुळे खेळपट्टी कशी खेळेल हे सांगता येत नाही. जर खेळपट्टीचा एक एन्ड पाहिला तर तो वेगळा दिसतोय.'

'भारतात मी अशा खेळपट्ट्या पाहिलेल्या नाहीत. ड्रेसिंग रूममधून खेळपट्टी हिरवी दिसते. मात्र तुम्ही खेळपट्टी जवळून पाहिली तर ती वेगळी दिसते. खूप डार्क आणि भरपूर भेगा असलेली दिसते.

रांचीची खेळपट्टी असते तरी कशी?

रांचीची खेळपट्टी ही कशी असते याबाबत बराच गोंधळ आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा खेळपट्टी खूप डार्क आणि भीतीदायक वाटली होती. मात्र त्यांचा हा समज गैरसमज ठरला. खेळपट्टी समतोल होती. काळ्या मातीतील खेळपट्टी ही थोडी संथ आणि लाल मातीच्या तुलनेत कमी धोकादायक असते.

भारतातील खेळपट्ट्या पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या करण्यात धोका असतो अशी खेळपट्टी दुधारी तलवारीसारखी असते. याचा फटका आपल्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात बसला होता.

दरम्यान, कोच राहुल द्रविडने खेळपट्टीची पाहणी केली असून त्याने काही सुचना देखील केल्या आहेत. त्यामुळे खेळपट्टी टर्नर असणार की फलंदाजांच नंदनवन असणार या चर्चांना उधाण आलं आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT