Indian Women Cricket Team X/BCCIWomen
Cricket

INDW vs SAW: भारताच्या महिलांसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; दुसऱ्या T20 मध्ये आज दक्षिण आफ्रिकेशी लढत

India vs South Africa Women T20I: भारतीय महिला संघाचा रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना रंगणार आहे.

Pranali Kodre

India vs South Africa Women: एकदिवसीय मालिका व एकमेव कसोटी जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला पहिल्याच टी-२० लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघासमोर रविवारी (ता. ७) होत असलेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे.

या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला या लढतीत विजय आवश्‍यक आहे. दक्षिण आफ्रिकेकडे ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील लढत रोमहर्षक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पहिल्या टी-२० लढतीमध्ये दोन्ही देशाला एक धक्का बसला. भारताची रिचा घोष व दक्षिण आफ्रिकेची ताझमिन ब्रिट्‌स यांना अनुक्रमे कनकशन व दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. झेल पकडायला गेली असताना रिचा घोषच्या चेहऱ्याला दुखापत झाली.

रिचाची दुखापत स्कॅनसाठी पाठवण्यात आली असून बीसीसीआयची वैद्यकीय समिती या दुखापतीकडे लक्ष ठेवून आहे. ताझमिन ब्रिट्‌स हिच्या पायाला दुखापत झाली; पण आगामी लढतींमध्ये खेळणार असल्याचे स्वत:हून तिने सांगितले. त्यामुळे सध्या तरी दक्षिण आफ्रिकेसाठी चिंतेचा विषय नाही.

क्षेत्ररक्षणात सुधारणा आवश्‍यक

पहिल्या टी-२० लढतीत यजमान भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी झाली. तीन झेल सोडण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या लढतीत भारतीय संघाला क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. प्रशिक्षक अमोल मुजुमदार हे अत्यंत कडक शिस्तीचे आहेत. त्यामुळे खेळाडूंना याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर याबद्दल म्हणाली, "पहिल्या टी-२० लढतीत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो नाही. क्षेत्ररक्षण करताना झेल सोडले. यामुळे २० धावांचा फटका बसला. फलंदाजी करताना निर्धाव चेंडू घालवले. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी अचूक टप्प्यात गोलंदाजी केली. आम्हाला धावा करण्यासाठी मोकळीक दिली नाही."

मानधनासह इतर फलंदाजांकडूनही आशा

भारतीय संघाची सलामी फलंदाज स्मृती मानधना हिने दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. पहिल्या टी-२० लढतीतही तिने ४६ धावांची खेळी साकारली; पण तिला मोठी खेळी करता आली नाही. हरमनप्रीत कौर व जेमिमा रॉड्रिग्ज या अनुभवी खेळाडूंमुळे भारतीय संघाची मधली फळी भक्कम आहे. शेफाली वर्मा व दयालन हेमलता या दोघींकडून शानदार खेळीची आशा आहे.

स्वीपचा फटका ठरणार मोलाचा

चेन्नईतील चेपॉकच्या स्टेडियमवर पहिला सामना खेळवण्यात आला. दुसरा सामनाही तेथेच होणार आहे. खेळपट्टीमध्येही कोणताही बदल होण्याची शक्यता कमीच आहे. या खेळपट्टीवर चेंडूला अधिक प्रमाणात उसळी मिळत नाही. त्यामुळे फिरकीपटूंसमोर स्वीपचा फटका सहज मारता येणार आहे. पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी स्वीपच्या फटक्यावर धावा वसूल केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT