Sneh Rana | India Women Team Sakal
Cricket

IND vs SA Test: फक्त पोरांनीच नाही, तर पोरींनीही दिलं द. आफ्रिकेला टेन्शन; एकट्या स्नेह राणाच्या 8 विकेट्स; पाहा Video

India vs South Africa Chennai Test: भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला चेन्नई कसोटीत फॉलोऑन दिला असून स्नेह राणाने एकाच डावात ८ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

Pranali Kodre

India vs South Africa Women Test: एकिकडे शनिवारी भारतीय पुरुष क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी२० वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावलेली असतानाच भारतीय महिला संघही चेन्नईमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत.

भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध चेन्नईमध्ये एकमेव कसोटी सामना होत आहे. या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे.

या सामन्यात भारताने पहिला डाव ६ बाद ६०३ धावांवर घोषित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात ८४.३ षटकात अवघ्या २६६ धावांवर सर्वबाद केलं. भारताकडून एकट्या स्नेह राणाने ८ विकेट्स घेतल्या.

स्नेह राणाने या डावात २५.३ षटके गोलंदाजी करताना ४ षटके निर्धाव टाकली, तसेच ७७ धावा खर्च करत ८ विकेट् घेतल्या. ती महिलांच्या कसोटीत एका डावात ८ विकेट्स घेणारी भारताची दुसरीच, तर एकूण तिसरी क्रिकेटपटू ठरली.

यापूर्वी नितू डेव्हिडने जमशेदपूरला १९९५ साली इंग्ंलड महिला संघाविरुद्ध कसोटीत दुसऱ्या डावात ५३ धावा खर्च करत ८ विरेट्स घेतल्या होत्या. ऍश्ले गार्डनरने नॉटिंगघम कसोटीत इंग्लंड महिला संघाविरुद्धच २०२३ मध्ये चौथ्या डावात ६६ धावा खर्च करत ८ विकेट्स घेतल्या होत्या.

महिला कसोटीत एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी

  • ८/५३ - नितू डेव्हिड (भारत विरुद्ध इंग्लंड, जमशेदपूर, १९९६)

  • ८/६६ - ऍश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगघम, २०२३)

  • ८/७७ - स्नेह राणा (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई, २०२४)

  • ७/६ - मेरी डुग्गन (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, १९५८)

  • ७/७ - बेट्टी विल्सन (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न, १९५८)

दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन

भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या २६६ धावांच सर्वबाद केल्याने पहिल्या डावात ३३७ धावांची आघाडी घेतली. त्याचमुळे दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात मॅरिझन कापने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली. तसेच स्युन ल्युसनेही ६५ धावांची खेळी केली. मात्र या दोघींव्यतिरिक्त अन्य कोणालाही खास काही करता आले नाही.

भारताकडून पहिल्या डावात स्नेह राणाव्यतिरिक्त दिप्ती शर्माने २ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

त्या चर्चा खऱ्या ठरल्या! अद्वैत- कलाची जोडी तुटणार; ईशा 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडणार, प्रोमो पाहून चाहते रडकुंडीला

SCROLL FOR NEXT