Nuwan Thushara will miss the series sakal
Cricket

IND vs SL: मोठी बातमी! श्रीलंकेच्या प्रमुख गोलंदाजाचं बोट मोडलं, भारताविरुद्धच्या मालिकेतून घेतली माघार

India vs Sri Lanka 2024 T20I: भारत-श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला २७ जुलैपासून सुरूवात होत आहे आणि त्याआधीच यजमानांना दोन धक्के बसले आहेत.

Swadesh Ghanekar

India vs Sri Lanka T20 Series: दुश्मंथा चमिरानंतर श्रीलंकेच्या आणखी एका गोलंदाजाला भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज नुवान तुषारा ( Nuwan Thushara ) याचे सरावादरम्यान डाव्या हाताचे बोट मोडलं आणि त्यामुळे त्याला ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घ्यावी लागली. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने तुषाराच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही.

टीम मॅनेजर महिंदा हलागोंडाने या वृत्ताला दुजोरा दिला आणि दुखापत न होणे हे गोलंदाजाच्या हातात नसते, असेही ते म्हणाले. बुधवारी सराव सत्रात नुवानला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाशझोतात सराव सुरू असताना नुवान क्षेत्ररक्षण करत होता.

भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेणारा नुवान हा श्रीलंकेचा दुसरा जलदगती गोलंदाज ठरला. बुधवारी दुश्मंथा चमिराने आजारपणामुळे माघार घेतली आणि त्याच्याजागी असिथा फर्नांडोची निवड केली गेली. नुवानच्या रिप्लेसमेंटची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी डावखुरा गोलंदाज दिलशान मदुशंका याला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुष्मंथा चमीरा अजूनही ब्राँकायटिस आणि श्वासोच्छवासाच्या संसर्गातून बरा होत आहे.

नुवान हा गेला वर्षभर श्रीलंकेच्या ट्वेंटी-२० संघाचा नियमित सदस्य आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी तो एक होात. त्याने ३ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या होत्या. यावर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध त्याने ट्वेंटी-२०त हॅटट्रिकसह २० धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. भारताविरुद्ध २७ जुलैपासून तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे, परंतु त्यापूर्वीच यजमानांची बाजू कमकुवत होताना दिसतेय.

श्रीलंकेचा ट्वेंटी-२० संघ : चरिथ असलंका (कर्णधार), पथूम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, महेश थिक्षाना, चामिंडू विक्रमसिंघे, चमिंडू विक्रमसिंघे, मथिसा पथिराना, बिनुरा फर्नांडो, असिथा फर्नांडो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT