Team India | ICC Women's T20 World Cup 2024 Instagram
Cricket

Women's T20 World Cup: भारतीय खेळाडूंना पहिल्या सामन्यापूर्वी कुटुंबियांकडून खास भेट, BCCI ने शेअर केला Video

Family Cheers on India Women Cricket Team: भारतीय महिला संघ शुक्रवारपासून टी२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना खास शुभेच्छा मिळाल्या आहेत.

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2024: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला गुरुवारी (३ ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे ही स्पर्धा होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाची मोहिम शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सुरू होणार आहे.

भारताचा पहिलाच सामना दुबईमध्ये न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होत आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना एक गोड भेट मिळाली.

खेळाडूंच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्याच्या व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आला. बीसीसीआयने याचा व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये दिसते की भारतीय संघातील खेळाडू एका रुममध्ये बसले आहेत. त्यांना आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

स्मृती मानधना, श्रेयंका पाटील, शफाली वर्मा, सजना सजीवन, हरमनप्रीत, रेणुका ठाकूर, पुजा वस्त्राकर, दिप्ती शर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, अशा अनेक खेळाडूंच्या कुटुंबियांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचे सामने

भारतीय संघ साखळी फेरीसाठी अ गटात आला. भारताला न्यूझीलंडनंतर ६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे.

त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा सामना श्रीलंका विरुद्ध होणार आहे, तर १३ ऑक्टोबर रोजी अखेरचा साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. त्यानंतर जर भारताने अ गटातून गुणतालिकेत पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळवलं, तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळेल.

  • भारतीय संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष ( यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया ( यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन

  • राखीव खेळाडू - उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT