India vs South Africa Women | Shafali Verma - Smriti Mandhana Sakal
Cricket

IND vs SA: वर्ल्ड कप फायनलपूर्वीच भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेला चोपलं, बनवला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड

India vs South Africa Women Test: भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईला सुरू असलेल्या कसोटी सामन्यात विश्वविक्रम केला आहे.

Pranali Kodre

India vs South Africa Women Test: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात शुक्रवारपासून (२८ जून) कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाने मोठा विश्वविक्रम केला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी पहिला डाव ११५.१ षटकात ६ बाद ६०३ धावांवर घोषित केला.

त्यामुळे आता महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विश्वविक्रम भारतीय महिला संघाच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्लिया महिला संघाच्या नावावर होता. त्यांनीही याचवर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच ९ बाद ५७५ धावा उभारल्या होत्या.

दरम्यान, चेन्नईत सुरू असलेल्या कसोटी सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने ताबडतोड फलंदाजी करताना पहिल्याच दिवशी ५०० धावांचा टप्पा ओलांडला होता.

भारताकडून पहिल्या डावात शफाली वर्माने द्विशतक ठोकलं. तिने आक्रमक खेळी करताना १९७ चेंडूतच २३ चौकार आणि ८ षटकारांसह २०५ धावांची खेळी केली. तसेच स्मृती मानधनानेही शतक केलं. तिने १६१ चेंडूत २७ चौकार आणि १ षटकारासह १४९ धावांची खेळी केली.

याशिवाय जेमिमाह रोड्रिग्स, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांनीही अर्धशतके केली. जेमिमाहने ९४ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. तसेच हरमनप्रीतने ११५ चेंडूत ६९ धावा केल्या. तसेच ऋचाने ९० चेंडूत ८६ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला ६०० धावांचा टप्पा पार करता आला.

दक्षिण आफ्रिकेकडून डेलमी टकरने २ विकेट्स घेतल्या. तसेच नादिन डी क्लर्क, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको एमलाबा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT