Team India X/BCCI
Cricket

IND vs ZIM: फलंदाजांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजही चमकले, टीम इंडियाची दुसऱ्या T20I मध्ये दणदणीत विजयासह मालिकेत बरोबरी

India vs Zimbabwe, 2nd T20I: झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली आहे.

Pranali Kodre

India vs Zimbabwe, 2nd T20I: झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी (७ जुलै) हरारेला पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेसमोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १८.४ षटकात १३४ धावांवरच सर्वबाद झाला.

दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध सर्वाधिक धावांनी विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारताने ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियानेही झिम्बाब्वेविरुद्ध १०० धावांनी विजय मिळवला होता.

विक्रमी २३४ धावांच्या लक्ष्याचा झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी पहिल्याच षटकात सलामीवीर इनोसंट कैयाची ४ धावांवर विकेट गमावली. परंतु, नंतर विझली मधवेरे आणि ब्रायन बेनेट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

परंतु, बेनेट २६ धावांवर बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेचा डाव कोसळला. त्यांनी ७६ धावांवर तब्बल ७ विकेट्स गमावल्या. तरी एका बाजूने मधवेरेने डाव सांभाळला होता. त्याला नंतर ल्युक जोंगवेने साथ दिली होती. परंतु, मधवेरेला ४३ धावांवर रवी बिश्नोईने त्रिफळाचीत केले.

त्यानंतर ब्लेसिंग मुझराबनीही २ धावांवरच बाद झाला, तर अखेरची विकेट जोंगवेच्या रुपात गेली. जोंगवेने २६ चेंडूत ३३ धावांची खेळी केली.

भारताकडून आवेश खान आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर रवी बिश्नोईने २ विकेट घेतल्या आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून कर्णधार शुभमन गिलने २ धावांवरच विकेट गमावल्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरताना १३७ धावांची भागीदारी केली.

यादरम्यान, अभिषेकने शतकही पूर्ण केले. मात्र, शतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने ४७ चेंडूत १०० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर रिंकु सिंगने ऋतुराजची चांगली साथ दिली. त्यांच्यात ८७ धावांची नाबाद भागीदारी झाली. त्यामुळे भारताने २० षटकात २ बाद २३४ धावा केल्या होत्या.

ऋतुराज ४७ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह ७७ धावांवर नाबाद राहिला. तसेच रिंकूने २२ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि वेलिंग्टन मसकद्झा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT