Team India Sakal
Cricket

Team India Schedule: कसोटी मालिका संपली आता पुढची मॅच कधी... जाणून घ्या टीम इंडियाचं पुढील वेळापत्रक

Indian cricket team full schedule 2024-25: भारतीय संघाने नुकतीच बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. यानंतरही भारताचे वेळापत्रक व्यस्त असणार आहे. आगामी ४ महिन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका अशा बलाढ्य संघाचे आव्हान असणार आहे.

Pranali Kodre

Team India Schedule: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशविरुद्ध मंगळवारी (१ ऑक्टोबर) कसोटी मालिकेत २-० अशा फरकाने विजय मिळवला.

पहिला सामना चेन्नईला झाले होता. या सामन्यात भारताने बांगलादेशला २८० धावांनी पराभवाचा धक्का दिला. त्यानंतर भारताने पावसाचा अडथळा आलेल्या कानपूर कसोटीत ७ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे भारताने बांगलादेशला व्हाईटवॉश दिला.

दरम्यान, भारताने दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर ही मालिका खेळली होती. मात्र आता या कसोटी मालिकेनंतरही भारताचे वेळापत्रक व्यस्त राहणार आहे. भारताला आगामी काळात मायदेशातच बांगलादेशविरुद्ध ६ ऑक्टोबरपासून टी२० मालिका खेळायची आहे.

६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान भारता आणि बांगलादेश संघात तीन सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. त्यानंतर लगेचच न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे.

त्यानंतर दोनच दिवसाच भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊन ८ नोव्हेंबरपासून चार सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. नोव्हेंबरमध्येच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. २१ नोव्हेंबरपासून भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका ७ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

भारतीय पुरुष संघाचे पुढील वेळापत्रक

भारत विरुद्ध बांगलादेश - टी२० मालिका

  • ६ ऑक्टोबर - पहिला टी२० सामना, ग्वाल्हेर (वेळ - संध्या. ७ वाजता)

  • ९ ऑक्टोबर - दुसरा टी२० सामना, दिल्ली (वेळ - संध्या. ७ वाजता)

  • १२ ऑक्टोबर - तिसरा टी२० सामना, हैदराबाद (वेळ - संध्या. ७ वाजता)

भारत विरुद्ध न्यूझीलंड - कसोटी मालिका

  • १६ - २० ऑक्टोबर - पहिला कसोटी सामना, बेंगळुरू (वेळ - स. ९.३० वाजता)

  • २४ - २८ ऑक्टोबर - दुसरा कसोटी सामना, पुणे (वेळ - स. ९.३० वाजता)

  • १ - ५ नोव्हेंबर - तिसरा कसोटी सामना, मुंबई (वेळ - स. ९.३० वाजता)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (टी२० मालिका)

  • ८ नोव्हेंबर - पहिला टी२० सामना (वेळ - रा. ९.३० वाजता)

  • १० नोव्हेंबर - दुसरा टी२० सामना (वेळ - रा. ९.३० वाजता)

  • १३ नोव्हेंबर - तिसरा टी२० सामना (वेळ - रा. ९.३० वाजता)

  • १५ नोव्हेंबर - चौथा टी२० सामना (वेळ - रा. ९.३० वाजता)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (कसोटी मालिका)

  • २२ ते २६ नोव्हेंबर - पहिला कसोटी सामना, पर्थ (वेळ - स. ८ वाजता)

  • ६ ते १० डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ऍडलेड (वेळ - स. ९.३० वाजता)

  • १४ ते १८ डिसेंबर - तिसरा कसोटी सामना, ब्रिस्बेन (वेळ - पहाटे ५.३० वाजता)

  • २६ ते ३० डिसेंबर - चौथा कसोटी सामना, मेलबर्न (वेळ - पहाटे ५.३० वाजता)

  • ३ ते ७ जानेवारी - पाचवा कसोटी सामना, सिडनी (वेळ - पहाटे ५.३० वाजता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT