Suryakumar Yadav esakal
Cricket

IND vs BAN 2nd T20I : इंडिया की शान, सूर्यकुमार! दिल्लीत पोहोचताच SKYचा भन्नाट डान्स, Video

India vs Bangladesh 2nd T20I : भारतीय संघ दुसऱ्या ट्वेटीं-२० सामन्यासाठी दिल्लीत पोहोचला आहे. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि दुसरा सामना बुधवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

Swadesh Ghanekar

IND vs BAN 2nd T20I Suryakumar Yadav Dance : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला ट्वेंटी-२० सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशला ग्वालियर येथील सामन्यात पराभूत केल्यानंतर टीम इंडिया दिल्लीत दाखल झाली आहे. बुधवारी भारत-बांगलादेश सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू दिल्लीत दाखल झाले आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला.

BCCI ने खेळाडूंच्या ग्वालियर ते दिल्ली या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दुसऱ्या सामन्यासाठी कर्णधार सूर्यासह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याचे मनोंबल उंचावलेले पाहायला मिळत आहे. या प्रवासात खेळाडू एकमेकांसोबत मज्जामस्करी करताना दिसत आहेत. राजधानीत पोहोचल्यानंतर संघाच्या स्वागतासाठी चाहते विमानतळाबाहेर दिसत आहेत. त्यानंतर हॉटेलमध्ये ढोल ताशांनी स्वागत केले गेले आणि यावेळी सूर्याला नाचण्यापासून स्वतःला रोखता आले नाही.  

भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२०त ७ विकेट्स व ४९ चेंडू राखून विजय मिळवला. बांगलादेशचे १२८ धावांचे लक्ष्य भारताने ११.५ षटकांत ३ बाद १३२ धावा करून सहज पार केले. अर्शदीप सिंग व वरुण चक्रवर्थी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेऊन बांगलादेशला धक्के दिले. त्यानंतर फलंदाजीत हार्दिक पांड्या ( ३९), संजू सॅमसन ( २९) व कर्णधार सूर्यकुमार यादव ( २९) यांनी कमाल केली.

भारताचा संभाव्य संघ – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा/मयांक यादव, अर्शदीप सिंग

बांगलादेशचा संभाव्य संघ – लिटन दास, परवेझ होसैन इमोन, तंझीज हसन, नजमूल शांतो, मेहिदी हसन मिराज, तौहिद हृदय, महमुदुल्लाह, रिषद होसैन, तंझिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्ताफिजूर रहमान


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT