Jasprit Bumrah Statement On Retirement sakal
Cricket

Jasprit Bumrah: बूम बूम बुमराहची कमाल! टी20 वर्ल्ड कप विजयानंतर ICC कडून मिळाला मोठा पुरस्कार; स्मृती मानधनाचाही सन्मान

Players of the Month Award: टी२० वर्ल्ड कप विजयानंतर बुमराहला आयसीसीचा मोठा पुरस्कारही जाहीर झाला आहे. तसेच स्मृती मानधनालाही आयसीसीचा पुरस्कार मिळाला आहे.

Pranali Kodre

Jasprit Bumrah, Smriti Mandhana ICC Awards: भारतीय संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप विजयाला गवसणी घातली होती. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला.

आता आयसीसीकडून त्याला आणखी एक मोठा पुरस्कार देण्यात आला आहे. बुमराहला जून २०२४ महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

याशिवाय भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनालाही जून २०२४ महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

बुमराहला आयसीसीचा पुरस्कार

जून महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी आयसीसीने बुमराहसह रोहित शर्मा आणि रेहमनुल्लाह गुरबाज यांनाही नामांकने मिळाली होती. मात्र, बुमराहने रोहित आणि गुरबाज यांना मागे टाकत या पुरस्कारावर नाव कोरले आहे.

दरम्यान, बुमराह, रोहित आणि गुरबाज या तिघांचीही जून महिन्यात खेळवण्यात आलेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली होती.

बुमराहने टी२० वर्ल्ड कपमध्ये ८ सामन्यांत ४.१७ च्या इकोनॉमीने १५ विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीमुळे तो टी२० वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार पटकावणारा विराट कोहलीनंतरचा दुसराच भारतीय ठरला होता.

हा पुरस्कार पटकावल्यानंतर बुमराहने कुटुंबाचे आभार मानले असून नामांकन मिळालेल्या अन्य दोन खेळाडूंचेही कौतुक केले आहे.

बुमराह म्हणाला, 'मला जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत शानदार टी२० वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर हा माझ्यासाठी खास सन्मान आहे. आम्ही संघ म्हणून खूप सेलीब्रेशन केलंय आणि मला आनंद आहे की मला हा पुरस्कार मिळाला.'

'मी माझा कर्णधार रोहित शर्मा आणि रेहमनुल्लाह गुरबाज यांचेही त्यांच्या कामगिरीसाठी अभिनंदन करतो.'

तसेच बुमराहने कुटुंब, संघसहकारी आणि प्रशिक्षकांचेही आभार मानले. त्याचबरोबर त्याला या पुरस्कारासाठी मत दिलेल्या चाहत्यांचेही आभार मानले.

मानधनाचाही सन्मान

जून महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी आयसीसीने मानधनासह इंग्लंडच्या मैया बौचर आणि श्रीलंकेच्या विश्मी गुणारत्ने यांनाही मानांकनं मिळाली होती. पण त्यांना मागे टाकत मानधाने हा पुरस्कार पटकावला.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ती म्हणाली, 'मला जून महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद आहे. संघाने जशी कामगिरी केली, त्यात योगदान दिल्याबद्दल मला आनंद आहे. मला आशा आहे मी ही लय कायम ठेवून भारताला सामने जिंकून देण्यात योगदान देऊ शकेल.'

मानधनाने जून २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळली होती. तिने या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत ११७ आणि १३६ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच तिसऱ्या वनडेत ९० धावांची खेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT