MS Dhoni Sakal
Cricket

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

MS Dhoni Records: भारताचा दिग्गज कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड्स आहेत.

सकाळ डिजिटल टीम

MS Dhoni Records: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मोठे यश मिळवले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्ये निवृत्ती घेतली.

दरम्यान, त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याने पुढे आयपीएलमध्ये खेळणे चालू ठेवले आहे. त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रमही आहेत, जे मोडलं जाणं कठीण आहे. अशाच काही विक्रमांबद्दल जाणून घेऊ.

तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवणारा एकमेव कर्णधार 

धोनी हा एकमेव कर्णधार आहे, ज्याने 2007 टी-20 वर्ल्डकप,  2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसह असे तीन वेगवेगळे आयसीसी विजेतेपदे जिंकली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यष्टीचीत

एमएस धोनी हा क्रिकेटमधील महान यष्टिरक्षक आहे. धोनीने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 123 यष्टीचीत केले आहेत. धोनीने (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये) मिळून 195 खेळाडूंना त्याच्या विजेच्या वेगाने यष्टीचीत केले आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्याने एकूण 332 सामन्यांमध्ये (वनडे, कसोटी आणि टी20) भारतीय संघाचे नेतृत्व केले. या यादीत धोनीनंतर रिकी पाँटिंग असून 324 सामन्यांचे नेतृत्व केले,  ज्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियासाठी 2 वनडे वर्ल्ड कपचा समावेश आहे.

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात षटकार मारून जिंकणारा एकमेव खेळाडू

महेंद्रसिंग धोनी हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने आपल्या संघासाठी फलंदाजी करताना षटकार मारून वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. धोनीने 2011 च्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात हा पराक्रम केला होता.

वर्ल्डकप 2011 मध्ये अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 79 चेंडूत नाबाद 91 धावा करून भारतासाठी सामना जिंकला. या खेळी दरम्यान धोनीने आठ चौकार आणि दोन षटकारही मारले.

वनडेत सर्वाधिक नाबाद खेळी

एमएस धोनी वनडेत आतापर्यंत 84 वेळा नाबाद परतला आहे. हा एक विक्रम आहे.

ऑस्ट्रेलियात क्लीन-स्वीप करणारा पहिला कर्णधार

धोनी हा पहिला भारतीय कर्णधार आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत टी20 मालिकेत क्लीन-स्वीप केले आहे. 2016 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी गेला होता. या मालिकेत धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 3-0 अशा फरकाने पराभूत केले होते.

सातव्या क्रमांकावर सर्वाधिक शतके करणारा फलंदाज

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा वनडे क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. त्याने या क्रमांकावर खेळताना २ शतके केली आहेत. धोनीने 2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 व्या क्रमांकावर पहिले शतक झळकावले. या सामन्यात धोनीने केवळ 97 चेंडूंचा सामना करत 139 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत धोनीने 15 चौकार आणि 5 षटकार मारले.

धोनीने 2012-13 मध्ये चेन्नई येथे 2012-13 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 7 क्रमांकाचा फलंदाज म्हणून झळकावलेले दुसरे शतक होते. या सामन्यात धोनीने 125 चेंडूंचा सामना करत 113 धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि तीन षटकारही मारले. 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणाऱ्या फलंदाजाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जास्त वेळ मिळत नाही,  त्यामुळे धोनीने केलेला हा विक्रम खरोखरच मोठा आहे. त्याच्यासोबत पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मायकल ब्रेसवेल संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT