fake application pm modi for team india coach sakal
Cricket

Indian Team Head Coach : चक्क PM मोदी यांचा भारताच्या कोचपदासाठी अर्ज? धोनी-सचिन अन् अमित शाह यांचंही नाव; काय आहे प्रकरण

Indian Team Head Coach : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते.

Kiran Mahanavar

Indian Team Head Coach : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. राहुल द्रविडही या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतो. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरे तर 'नरेंद्र मोदी'पासून 'अमित शाह', महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वांनी या पदासाठी अर्ज केले आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार नरेंद्र मोदी, अमित शाह, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांच्या नावाने बनावट अर्ज आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मुख्य प्रशिक्षकपदासाठी 3,000 हून अधिक अर्जदार मिळाले आहेत.

अहवालानुसार, बीसीसीआयला तेंडुलकर, धोनी, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि इतर माजी क्रिकेटपटूंच्या नावाने अनेक अर्ज आले. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसारख्या राजकारण्यांचीही नावे आहेत.

भारतीय मंडळांना बनावट अर्ज प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्येही जेव्हा बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. त्यावेळी अनेक सेलिब्रिटींकडून अर्ज आले होते. त्यानंतर बोर्डाने इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज पाठवण्यास सांगितले, यावेळी बीसीसीआयने Google Forms चा वापर केला.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या वर्षीही बीसीसीआयला असाच प्रतिसाद मिळाला होता जिथे फसवणूक करणाऱ्यांनी अर्ज केला होता आणि यावेळीही तीच गोष्ट झाली आहे. बीसीसीआय गुगल फॉर्मवर अर्ज मागवण्याचे कारण म्हणजे एका शीटमध्ये अर्जदारांची नावे तपासणे सोपे आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT