Sanju Samson esakal
Cricket

IND vs BAN 1st T2OI : संजू सॅमसन ओपनिंगला, मयांक किंवा हर्षित यांचे पदार्पण? पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI

India vs Bangladesh 1st T20I : कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० मालिकेत बांगलादेशला नमवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 1st T20I : कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० मालिकेत बांगलादेशला नमवण्यासाठी सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा जोश असलेला भारतीय संघ उद्या बांगलादेशविरुद्ध मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. ग्वालियरच्या माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच होणार आहे.

ट्वेंटी-२० संघात सीनियर्स खेळाडूंच्या गैरहजेरीत संजू सॅमसनला पहिल्या सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याच्यासोबत अभिषेक शर्माला संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळेल आणि आसामचा ऑल राऊंडर रियान पराग हा चौथ्या क्रमांकावर खेळले. त्याने जुलै महिन्यात भारताकडून पदार्पण केले.  

या संघात हार्दिक पांड्या हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि मधल्या षटकांमध्ये तो फलंदाजी व गोलंदाजीत त्याचा उपयुक्तता सिद्ध करू शकतो. शिवम दुबेला आणि नितीश कुमार रेड्डीकडून कडवी टक्कर मिळू शकते. २१ वर्षीय नितीशने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चा हंगाम गाजवला आणि तो इमर्जिंग प्लेअर ठरला होता. दुबे व हार्दिक यांच्यासारखीच तो मध्यमगती गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याला या मालिकेत पदार्पणाची संधी मिळू शकते.

रिंकू सिंग हा भारताच्या ट्वेंटी-२० संघातील नियमित खेळाडू आहे आणि त्याच्यावर मॅच फिनिशरची भूमिका बजावण्याची जबाबदारी असेल. वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांचे स्थान पक्के समजले जात आहे. वरुण चक्रवर्थीला पहिल्या ट्वेंटी-२०त संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तो नोव्हेंबर २०२१मध्ये भारताकडून शेवटचा खेळला होता. जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्या अनुपस्थिती अर्शदीप सिंग याच्यावर जलदगती माऱ्याची जबाबदारी असेल. त्याच्यासोबतली हर्षित राणा व मयांक यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारताचा संभाव्य संघ – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मयांक यादव.

असा आहे भारतीय संघ -

सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव

भारत विरुद्ध बांगलादेश टी२० मालिकेचे वेळापत्रक

  • ६ ऑक्टोबर - पहिला टी२० सामना, ग्वाल्हेर (संध्या. ७ वा.)

  • ९ ऑक्टोबर - दुसरा टी२० सामना, दिल्ली (संध्या. ७ वा.)

  • १२ ऑक्टोबर - तिसरा टी२० सामना, हैदराबाद (संध्या. ७ वा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाकरे ठाकरे - मोदी मोदी, BMC सभागृहात शिवसेना ठाकरे गट अन् भाजप आमने-सामने; फडणवीसांसमोरच जोरदार घोषणाबाजी

Post Office Scheme : बँक FD विसरा! पोस्ट ऑफिस स्कीम देणार सुरक्षित 60 हजार रुपयांची हमखास कमाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Revati Sule : लेकीचं लग्न होणार, सुप्रिया सुळेंनी दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं, सांगायला आनंद होतोय

Promise Day Horoscope: या राशींच्या लोकांनी प्रॉमिस डे ला 'ही' चूक करू नका; नाहीतर पार्टनर होईल नाराज, वाचा तुमचं राशीभविष्य

Honda Special Edition Scooter : होंडाने 'या' लोकप्रिय स्कूटरचे स्पेशल एडिशन केले लाँच; दमदार मायलेज, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT